एक्स्प्लोर

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात : योगी आदित्यनाथ

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपचा 48 जागांवर विजय झाला आहे. तसेच टीआरएसने 55 जागा जिंकल्या असून एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत.

GHMC Election Result 2020: ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये मोठे उलटफेर झाले असून गेल्यावेळेस तीन जागा मिळवणाऱ्या भाजपने  48 जागांवर विजय मिळवला आहे. 150 जागांपैकी 149 जागांचे निकाल हाती आले आहे. या आकडेवारीनुसार ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपचा 48 जागांवर विजय झाला आहे. तसेच टीआरएसने 55 जागा जिंकल्या असून एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर अजूनही एका जागेचा निकाल हाती आलेला नाही.

भाजपाच्या यशानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत हैदराबादच्या जनतेचे आभार मानले आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार.भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे."

150 जागांच्या हैदराबाद महापालिकेसाठी 1 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान पार पडलं होतं. त्यामुळे संपूर्ण निकालाचं चित्र संध्याकाळी किंवा रात्री स्पष्ट होईल. जीएचएमसी निवडणुकी 1122 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. 30 ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत टीआरएसने महापालिकेवर ताबा मिळवला होता.

निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांनी जोर लावला होता. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रचार आणि प्रसार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला होता.

मागील निवडणुकीत टीआरएसला बहुमत 2016 मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणूक निकालात टीआरएसने 150 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. तर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM ला 44 जागां मिळाल्या होत्या. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसच्या खात्यात दोनच जागा जमा झाल्या होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Embed widget