GHMC Election Voting Live Updates: राज्यात विधानपरिषद शिक्षक-पदवीधर तर हैदराबादमध्ये महापालिकेसाठी आज मतदान
GHMC, Hyderabad Municipal Corporation Election Polling Live Updates: राज्यात विधानपरिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी मतदान होत आहे. तर तेलंगाणा राज्यात ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.
LIVE
Background
मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज (1 डिसेंबर) मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. तर तिकडे तेलंगाणा राज्यात ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.
राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणूक
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सद्यस्थितीत 1122 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात 150 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. हैदराबाद हा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप सुरुंग लावण्याची प्रयत्न करीत आहे. याची सुरुवात विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आपला आधार मजबूत करून सुरूवात केली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून 4 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.
मागील वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्ष तेलंगना राष्ट्र समितीने (टीआरएस) विजय मिळविला होता. टीआरएसने 99 जागा जिंकल्या. त्याच वेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष एआयएमआयएमलाही 44 जागा मिळाल्या. पण यावेळी भाजपने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे.