एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशात ऑपरेशन 'दस्तक', 24 तासात 182 गुंड गजाआड
रविवारी एका रात्रीत सहा एन्काऊंटर केल्यानंतर आता गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेश पालिसांनी ऑपरेशन ‘दस्तक’ राबवलं. ज्यामध्ये 24 तासात 182 गुंडांच्या मुसक्या आवळल्या.
लखनौ : उत्तर प्रदेशातील गुंडाराज संपवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना संपूर्ण मोकळीक दिली आहे. रविवारी एका रात्रीत सहा एन्काऊंटर केल्यानंतर आता गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेश पालिसांनी ऑपरेशन ‘दस्तक’ राबवलं. ज्यामध्ये 24 तासात 182 गुंडांच्या मुसक्या आवळल्या.
ऑपरेशन ‘दस्तक’ शनिवारी सकाळी 8 वाजता सुरु झालं, ज्यामध्ये 81 वाँटेड आणि 101 असे आरोपी ज्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या 270 जणांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी 12 तास राबवलेल्या मोहिमेनंतर 24 इतर आरोपींनी स्थानिक न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केलं. ज्यापैकी 12 जणांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, तर बाकींच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे.
दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशात एका रात्रीत एकानंतर एक अशा सहा एन्काऊंटरमध्ये दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला होता. नोएडा पोलिसांनी 1 लाख रुपयांचं इनाम असलेला वाँटेड गुंड श्रवन चौधरीला कंठस्नान घातलं. दिल्ली आणि नोएडात खुनाचे गुन्हा दाखल असलेला श्रवन अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी घटनास्थळाहून एके 47, एसबीबीएल गन आणि स्विफ्ट डिजायर जप्त केली.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर, दादरी, गाझियाबाद, नोएडा, मुजफ्फरनगर या भागांमध्ये एन्काऊंटर करण्यात आला होता. यामध्ये दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला. तर चार जणांना अटक करण्यात आली होती. गुंडांची सफाई मोहिम चालूच राहणार असल्याचंही पोलिसांनी ठणकावून सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement