एक्स्प्लोर
राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाची लूट, मायलेकीवर बलात्कार
लखनौ : गाझियाबाद आणि अलिगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या गँगरेपच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कारला अडवून कुटुंबाला लुटत मायलेकीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नॉएडाहून शाहजहांपूरला जाणाऱ्या एका कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ ओढवली आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक 91 वर काही नराधमांनी सायकलचं चाक फेकून या कुटुंबाची गाडी अडवली. त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने लुटल्यानंतर मायलेकीला त्यांनी शेतात खेचून नेलं. तिथेच दोघींसोबत कुकर्म केल्यानंतर त्यांना सोडून आरोपींना पळ काढला.
विशेष म्हणजे या गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर चार तास हे नाट्य रंगलं. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. त्यानंतर एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.
कारमध्ये दोन भाऊ आणि दोघांच्या पत्नी, एका भावाचा 10 वर्षीय मुलगा आणि दुसऱ्या भावाची 13 वर्षीय मुलगी प्रवास करत होते. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झाल्यामुळे विधी करण्यासाठी हे कुटुंब गावी चाललं होतं. त्यावेळी धाकट्या भावाच्या पत्नी आणि मुलीवर गँगरेप झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement