Gandhi Jayanti 2022 : गांधीवादातून हे पाच धडे तुम्ही घेतलेच पाहिजेत, जाणून घ्या काय आहे
Mahatma Gandhi : गांधीवादाने जगभरातील प्रत्येक गोष्टीला स्पर्श केलं आहे. गांधींवादातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत.
मुंबई: जगातला असा एखादाच व्यक्ती असेल ज्याचा संबंध कधीही गांधीवादाशी आला नसेल, गांधीवादाच्या कोणत्याही मूल्याने त्याच्या आयुष्याला स्पर्श केला नसेल. गांधीवाद जगातल्या प्रत्येक गोष्टीत आहे, त्याची प्रचिती सातत्याने येते. सत्याचा आग्रह आणि अहिंसा या गोष्टीच्या जोरावर महात्मा गांधींनी जगात मोठा बदल घडवले. महात्मा गांधींचे असे काही विचार आहेत जे आपण आचरणात आणल्यास आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील.
1. आधी स्वत:मध्ये बदल करा
जो बदल तुम्हाला जगात किंवा आजूबाजूला घडवायचा असेल तो बदल आधी तुम्ही स्वतः मध्ये घडवा असं महात्मा गांधी म्हणायचे. महात्मा गांधींचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण समाजातील अनेक गोष्टींविषयी तक्रारी करत बसतो. आपल्याला समाजात अनेक बदल अपेक्षित असतात. मग त्या बदलांना आपल्या स्वत:पासून सुरुवात करावं असं महात्मा गांधी म्हणतात. महात्मा गांधी म्हणायचे की मी परिपूर्ण नाही, माझ्यात ही अनेक वाईट गोष्टी आहेत. पण इतरांच्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी पाहतो.
2. लहान गोष्टींमुळे तुम्ही जगात सकारात्मक बदल घडवू शकता
एखाद्या छोट्याच्या गोष्टींमुळे तुम्ही जग बदलू शकता, एक अगदी लहान गोष्ट करून तुम्ही जगामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता असं महात्मा गांधी म्हणतात. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही एखाद्या लहान बदलापासून होत असते. मिठासारख्या अगदी सामान्य गोष्टीचा वापर करुन गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात सर्वात मोठा लढा उभा केला हा त्याचाच भाग. त्यामुळे अगदी लहान गोष्टीच्या माध्यमातूनही आपण मोठं काहीतरी काम करु शकतो. कर्म करत राहणे, फळाचीर चिंता न करणे असं भगवद्गितेत सांगितलं आहे. तीच गोष्ट गांधीजींनी आयुष्यभर कटाक्षाने पाळली.
3. माफी करणे हे शूराचं लक्षण
एखाद्याने गुन्हा केलाच तर त्याला माफ करा, त्याच्याबद्दल बदलाची भावना ठेवू नका असं गांधीजी म्हणायचे. 'An Eye For An Eye Makes Whole World Blind' असं जर झालं तर, प्रत्येकजण बदलाची भावना मनात ठेवून कृती करु लागला तर संपूर्ण जगच हिंसेच्या मार्गावर चालेल, जगातली मानवता संपेल असं गांधीजी म्हणायचे. त्यामुळे कुणाचंही भलं होणार नाही. त्यामुळे दुसऱ्यांना माफ करा, माफ करणं हे सर्वात मोठं काम आहे. एखाद्याला माफ करणं हे दुर्बलतेचं लक्षण नसून ते शूराचं लक्षण आहे.
4. साधी राहणीमान
गांधीजींनी स्वत: आयुष्यभर साधी राहणीमानाचं तत्व पाळलं. आपल्याला गरजेपुरत्या गोष्टी बाजूला ठेवायचं, भौतिकवाद नाकारायचा ही गांधीजींची शिकवण. आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच वापरा, कारण पृथ्वी सर्वांच्या गरजा पुरवू शकते पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू शकत नाही असं ते म्हणायचे. गरजेपेक्षा जास्त घेणं हे पुढच्या पिढीसाठी त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी समस्याकारक ठरु शकतात. भविष्यातील पीढी ही तशीच होऊ शकते, त्यामुळे भौतिक गोष्टीवर भर नको असं ते म्हणायचे.
5. आपण जो विचार करतो, तशाच पद्धतीने वागतो
मनुष्य हा त्याच्या विचाराचा प्रोडक्ट असतो, एखाद्या व्यक्ती ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने त्याची जडणघडण होती असं महात्मा गांधी म्हणायचे. एखाद्या व्यक्तीच्या मनात जो विचार येतो त्या पद्धतीने त्याचे वर्तन असते.