एक्स्प्लोर

G20 Summit : पंतप्रधान मोदी शिखर संमेलनात ऋषी सुनक यांच्यासह 10 नेत्यांची भेट घेणार, युक्रेन युद्धासह महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

G20 Summit : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी20 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी तीन दिवसीय इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. या संमेलनात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

G20 Summit 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडोनेशियामधील ( Indonesia ) बाली ( Bali ) शहरात जी20 शिखर संमेलनात ( G20 Summit 2022 ) सहभागी होतील. हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. पंतप्रधान आज दौऱ्यासाठी रवाना होतील. शिखर संमेलनात विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आरोग्य, साथीच्या रोगानंतरची आर्थिक आपप्ती, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. या परिषदेत आव्हानांना तोंड देण्यासाठी या शिखर परिषदेत भारत आपला दृष्टीकोन मांडणार आहे.

रशिया युक्रेन युद्धासह महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

15 आणि 16 नोव्हेंबर रोजी 17 वी जी20 शिखर इंडोनेशियामध्ये पार पडणार आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्ष आणि त्याचा जगावर झालेला परिणाम यासोबतच जागतिक आव्हानांवर आज शिखर संमेलनात व्यापक चर्चा होईल. जी20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशियाच्या बाली शहराला तीन दिवसांच्या भेटीवर रवाना होतील.

'या' देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होतील?

अमेरिकेचे ( America ) अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ), ब्रिटनचे ( Britain ) पंतप्रधान ऋषी सुनक ( Rishi Sunak ), फ्रान्सचे ( France ) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( Emmanuel Macron ), जर्मनीचे ( Germany ) चांसलर ओलाफ स्कोल्झ ( Olaf Scholz ) आणि चीनचे ( China ) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping ) हेही जी20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सामील होणार असूनच अनेक राष्ट्रप्रमुखांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि सुनक यांची भेट होणार आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक होणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

भारताला मिळणार G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद

2023 मध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. या परिषदेचे 2023 ला भारतात आयोजन करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी 17 वी शिखर परिषद पार पडणार आहे. या शिखर परिषदेच्या समारोपाच्या सत्रात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रतीकात्मकपणे G20 चे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींना सुपूर्द करतील. 

शी जिनपिंग यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, इतर नेत्यांसोबतच्या या द्विपक्षीय बैठका अद्याप नियोजन प्रक्रियेत आहेत. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये उझबेकिस्तान येथे समरकंद शहरात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते, परंतु या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही द्विपक्षीय बैठक झाली नाही.

परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी सांगितलं आहे की, G20 परिषदेत सर्व राष्ट्रांचे प्रमुख जगासमोरील आव्हानांवर चर्चा करतील आणि त्यांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय सहकार्याचं महत्त्व समजून घेतील. पुढे त्यांनी सांगितलं, ही शिखर परिषद भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ते 1 डिसेंबरपासून एका वर्षासाठी जी शिखर परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget