G20 : भगवद्गीतेतून परदेशी पाहुण्यांना मिळेल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर! 'भारत मंडपम' मध्ये लावला AI Ask Gita चैटबॉट, कसं काम करतं चैटबॉट?
G20 Summit : परदेशी पाहुण्यांना भारतातील अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. भारत सरकारने भारत मंडपमच्या हॉलमध्ये एक विशेष AI चॅटबॉट देखील लावला आहे,
G20 Summit : G20 संमेलन भव्यदिव्य करण्यासाठी भारत सरकारने (Indian Government) सर्व तयारी केली आहे. दरम्यान, दिल्लीतील प्रगती मैदान, भारत मंडपम येथे परदेशी मंत्र्यांची बैठक 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी आलेल्या परदेशी पाहुण्यांना भारत आपले हायटेक तंत्रज्ञान देखील दाखवेल. यासाठी भारत मंडपममध्ये 'डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन' तयार करण्यात आला आहे, जिथे परदेशी पाहुण्यांना भारतातील अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. भारत सरकारने भारत मंडपमच्या हॉल 4 आणि 14 मधील क्षेत्रात एक विशेष AI चॅटबॉट देखील लावला आहे, जो भगवद्गीतेवर आधारित पाहुण्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईल.
भगवद्गीतेवर आधारित मिळणार प्रश्नांची उत्तरे
सरकारने डिजिटल झोनमध्ये Ask GITA चॅटबॉट लावले आहे, जे परदेशी पाहुण्यांना भगवद्गीतेच्या आधारे त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करणार आहे. जसे की आनंदी राहण्यासाठी काय करावे? यश न मिळाल्यास काय करावे? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या माध्यमतून मिळणार आहेत. या संदर्भातील एक व्हिडीओ पीआयबीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. चॅटबॉटच्या माध्यमातून परदेशी पाहुणे इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकतात.
भारताच्या डिजिटल यशाबद्दल..
या समिटमध्ये एक प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे, ज्यामध्ये पाहुण्यांना 2014 पासून भारताच्या डिजिटल यशाबद्दल सांगण्यात येईल. भारताच्या डिजिटल क्षमता आणि सुविधांचे प्रदर्शन करण्यासाठी समिटमध्ये डिजिटल झोनची स्थापना करण्यात आली आहे. याचे नेतृत्व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय करणार आहे.
पाहुण्यांना पेमेंटची कोणतीही अडचण येणार नाही
G20 शिखर परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी डिजिटल पेमेंट सुलभ करण्यासाठी भारत सरकारने UPI वन वर्ल्ड फ्रेमवर्क सादर केले आहे. UPI One World Framework हे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) आहे जे UPI सेवांसोबत एकत्रित केले आहे. याच्या माध्यमातून G20 संमेलनासाठी विविध देशांमधून येणारे परदेशी नागरिक आणि अनिवासी भारतीयांनाच केवळ डिजिटल पेमेंट करता येईल.
तयारी जवळपास पूर्ण, पाहुण्यांचे आगमन सुरू
देशात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार्या G-20 शिखर परिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून पाहुण्यांचे आगमन हळूहळू सुरू झाले आहे. काही पाहुणे गुरुवारी (7 सप्टेंबर) आले तर काही आज शुक्रवारी (8 सप्टेंबर) पोहोचतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या कार्यक्रमाची माहिती देताना व्हाईट हाऊसने सांगितले की, ते शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता नवी दिल्लीत पोहोचत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या