India Head of the G20 Group : जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताकडे; पंतप्रधान मोदी म्हणाले, जगात वाढणार एकात्मतेची भावना
India Head of the G20 group : जगभरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांचा समूह असलेल्या जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताने औपचारिकपणे स्वीकारले आहे. जी-20चे अध्यक्षपद भारत संपूर्ण वर्षभर सांभाळणार आहे.
India Head of the G20 group : जगभरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांचा समूह असलेल्या जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताने औपचारिकपणे स्वीकारले आहे. जी-20चे अध्यक्षपद भारत संपूर्ण वर्षभर सांभाळणार आहे. जी-20 जगाच्या 75 टक्क्यांहून अधिक व्यापार आणि जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. जी-20चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे की, ''भारत आज जी-20चे अध्यक्षपद ग्रहण करत असताना आगामी वर्षात आपण सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक अजेंडा राबवून जागतिक कल्याण साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करू इच्छितो या विषयी काही विचार मांडले आहेत.'' ते म्हणाले, '',जी-20 संघटनेच्या यापूर्वीच्या 17 अध्यक्षांच्या कार्यकाळात बृहद- आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय करआकारणी तर्कसंगत करणे, देशांवरील कर्जाचा बोजा कमी करणे, असे आणखी अनेक उत्तम परिणाम दिसून आले. आपल्याला या कामगिरींचा लाभ होईल. याच मार्गावर चालत आपण आणखी चांगली कामगिरी करू.
As India assumes G20 Presidency, PM @narendramodi penned an insightful blog. #G20India https://t.co/4PIKnzBROI
— PMO India (@PMOIndia) December 1, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी भारत स्वीकारत असताना, मी स्वतःलाच विचारतो- जी-20 ला आणखी पुढे जाता येईल का? आपण समस्त मानवजमातीला लाभ देण्यासाठी मूलभूत मानसिकतेमधील बदलाला चालना देऊ शकतो का? मला असे वाटते की आपल्याला हे शक्य आहे. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार आपली मानसिकता तयार होते. आपल्या संपूर्ण इतिहासात माणुसकीचे जे स्वरूप असायला हवे होते, त्याच्यात एक प्रकारची कमतरता जाणवते. आपण मर्यादित संसाधनांसाठी लढलो, कारण आपले अस्तित्व त्या संसाधनांपासून इतरांना वंचित ठेवण्यावर अवलंबून होते. दुर्दैवाने आपण अजूनही त्याच मानसिकतेत अडकलो आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या जी-20 अध्यक्षीय कार्यकाळात एकतेच्या सार्वत्रिक भावनेला चालना देण्यासाठी काम करण्यात येईल. म्हणूनच ‘ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे आपलं घोषवाक्य असेल. ते म्हणाले, हे केवळ एक घोषवाक्य नाही. मानवी परिस्थितीमध्ये अलीकडच्या काळात झालेले बदल ज्यांची एकत्रितपणे दखल घेण्यात आपण कमी पडलो, त्यांचा विचार यामध्ये आहे. जगामधल्या सर्वांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकेल इतके उत्पादन करण्याची साधने आपल्याकडे आहेत.
दरम्यान, जी-20 हा जगातील प्रमुख विकसनशील देशांचा एक मंच आहे. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया (Republic of Korea), मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन देशांचा समावेश आहे.