एक्स्प्लोर

श्रीरामाची अयोध्या... प्रवास निर्मिती ते विध्वंसाचा

भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. यानिमित्ताने अयोध्याकांडाच्या इतिहासावर एक नजर

मुंबई : निवडणुका जवळ येऊ लागल्या, तसा राम मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचं दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा सुरु होत आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबईतून विशेष विमानाने सकाळी 11 वाजता अयोध्येसाठी रवाना होतील. पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत दौऱ्यावर असतील. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करणार आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचं आयोजन केलं आहे. अयोध्येत उद्या (रविवारी) उद्धव ठाकरे सभेला जनतेला हिंदी भाषेत संबोधित करतील.  भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. यानिमित्ताने श्रीरामाच्या अयोध्येचा निर्मितीपासून विध्वंसाचा इतिहास- •  प्रभू श्रीरामाचे पूर्वज वैवस्वत यांनी अयोध्या वसवली •  वसवल्यापासून अयोध्यानगरीवर सूर्यवंशी राजांचे राज्य •  प्रभू श्रीरामाचा जन्म या नगरीतच •  प्रभू श्रीरामाच्या शरयू समर्पणानंतर अयोध्या उजाड •  प्रभू श्रीरामाचे सुपुत्र कुशकडून पुन्हा एकदा अयोध्येचा पुनरोद्धार •  पुनरोद्धारानंतर 44 पिढ्यांपर्यंत अयोध्येवर सूर्यवंशींचं राज्य •  महाभारत युद्धात अभिमन्यूने कौशलराज बृहद्वलाला मारले आणि अयोध्या पुन्हा उजाड झाली •  चढउताराच्या सर्व परिस्थितीत प्रभू श्रीरामजन्मभूमीचं अस्तित्व कायम राहिलं •  इसवी सन पूर्व 100 उज्जैनचे सम्राट विक्रमादित्यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बनवले •  दरम्यानच्या काळात अयोध्येवर जैन, बौद्ध धर्मीयांचाही प्रभाव होता •  चौदाव्या शतकापर्यंत भारतात अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला, पण प्रभू श्रीरामांचे मंदिर सुरक्षित •  मुघलांच्या राजवटीत सातत्यानं आक्रमणं झाली आणि अखेर 1527-28 मध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. इतिहास अयोध्याकांडाचा... ·1528 साली अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या जागी बाबरी मशिदीचं बांधकाम ·1853 साली रामजन्मभूमीच्या जागेच्या ताब्यावरुन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये पहिला हिंसाचार ·1859 साली इंग्रजांनी तारांचं कुंपण बांधून हिंदू आणि मुस्लिमांना स्वतंत्र जागा दिल्या ·1885 साली श्रीरामजन्मभूमी प्रकरण पहिल्यांदाच न्यायालयात गेलं. महंत रघुबर दास यांनी फैजाबाद न्यायालयात श्रीराम मंदिर बांधकामासाठी परवानगी अर्ज दाखल केला ·23 डिसेंबर 1949 रोजी श्रीराम जन्मभूमीस्थानी श्रीरामाची मूर्ती ठेवली गेली, हिंदूंची पूजाअर्चा सुरु झाली, तर मुस्लिम समाजाचा नमाज बंद झाली ·1984 साली विश्व हिंदू परिषदेने श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्मितीसाठी अभियान सुरु केले ·1 फेब्रुवारी 1986 रोजी फैजाबाद जिल्हा न्यायालयाने वादग्रस्त जागी हिंदूंना पूजेची परवानगी दिली, टाळे उघडले ·1986 साली मुस्लिम समाजाने बाबरी मशिद अॅक्शन कमिटीची स्थापना केली · जून 1989 मध्ये भाजपने विहिंपला अधिकृत समर्थन दिले · 9 नोव्हेंबर 1989 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी बाबरी मशिदीजवळ शिलान्यासाची परवानगी दिली ·1990 साली भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली, दंगली उसळल्या ·6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी अयोध्येत पोहचून बाबरी मशिद उद्ध्वस्त केली ·1992 सालानंतर सातत्याने न्यायालयीन लढाई सुरुच राहिली. आताही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 2019 मध्ये पुढील सुनावणी होणार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bhiwandi Rain : अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडाले; पावसाने मोठं नुकसानChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 17 मे 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2024Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
Prithviraj Chavan: भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Embed widget