एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्ली विधानसभेचा सल्लागार असल्याचे सांगून मुंबईत फसवणूक
मिलिंद लवांदेकडे अनेक बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्र सापडले आहेत. दिल्ली विधानसभा सल्लागार, केंद्रीय मंत्री सल्लागार, ऑलिम्पिक समिती सदस्य (उत्तर प्रदेश), दिल्ली प्रेस रिपोर्टर, बनावट मतदान ओळखपत्र, नऊ एटीएम कार्ड मिलिंद लवांदेकडे सापडली आहेत.
मुंबई : दिल्ली विधानसभेचा सल्लागार आहे, असे सांगत, तसेच भारत सरकारच्या नावाचं स्टिकर गाडीवर लावून श्रीमंतांची फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मुंबई खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. मिलिंद लवांदे असे या गुन्हेगाराचे नाव असून, तो मुंबईतील कांदिवलीचा रहिवासी आहे. मिलिंदला न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिलिंद लवांदे हा श्रीमंतांना हेरुन त्यांना फायनांस कंपनीद्वारे कमी व्याजात कर्ज देण्याचे आमिष दखवायचा आणि प्रोसेसिंग फीच्या नावाने पैसे उकळायचा.
प्रकरण काय आहे?
मिलिंद लवांदे हा अट्टल गुन्हेगार आहे. मिलिंदने आपल्या जाळयात आतापर्यंत अनेक लोकांना खेचले आहे. यामध्ये बहुतांश बांधकाम व्यावसायिक आहेत. ज्यांना शेकडो कोटी रुपयांची गरज असते. अशा लोकांना आपली हाय-फाय लाईफस्टाइल दाखवून तो लुबडत असे. तसेच भारत सरकारचे अनेक खोटे ओळखपत्र दाखवून, आपल्या ओळखीने मोठ्या रकमेचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत असे.
मिलिंद लवांदेकडे अनेक बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्र सापडले आहेत. दिल्ली विधानसभा सल्लागार, केंद्रीय मंत्री सल्लागार, ऑलिम्पिक समिती सदस्य (उत्तर प्रदेश), दिल्ली प्रेस रिपोर्टर, बनावट मतदान ओळखपत्र, नऊ एटीएम कार्ड मिलिंद लवांदेकडे सापडली आहेत.
मिलिंद लवांदेकडे सध्या सहा महागड्या गाड्या सापडल्या आहेत, ज्यावर दिल्ली विधानसभेचा सल्लागार आणि भारत सरकारचा स्टिकर लावलेला आहे.
मिलिंद लवांदे सुशिक्षित व्यक्ती असून, तो सिटी बँकेत कुरियर बॉय म्हणून काम करायचा. तिथेच त्याने कर्जाचे कागदपत्रे कसे बनवयचे शिकून घेतलं आणि ती नोकरी सोडल्यावर गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला.
दिल्ली, हरियाणा, गुरगाव, पुणे आणि मुंबईमध्ये देखील यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे आधीच दाखल आहेत. खंडणी विरोधी पथकाने देखील IPC 419, 465, 467, 468, 471 या कलमांअंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी अशा तोतया लोकांच्या फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
ठाणे
Advertisement