माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन, वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे थोरले बंधू मोहम्मद मुथु मीरा लेब्बाई मरैकयर (Mohammed Muthu Meera Lebbai Maraikayar) यांचे निधन झाले आहे.
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथु मीरा लेब्बाई मरैकयर (Mohammed Muthu Meera Lebbai Maraikayar) यांचे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे त्यांच्या घरी निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. मीडिया रिपोर्टनुसार, मोहम्मद मुथु वृद्धपकाळामुळे अनेक आजारांशी झगडत होते. सोबतचं त्यांना एका डोळ्यात संक्रमणही झाले होते. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी या जगाचा याआधीच निरोप घेतला आहे. मेघालयातील शिलाँग येथे 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले होते.
अब्दुल कलाम यांचे वडील खलाशी म्हणून काम करायचे, त्यांचं शिक्षणही कमी होते. ते मच्छीमारांना बोट भाड्याने देत असे. अब्दुल कलाम यांचे बालपण दारिद्र्य आणि संघर्षातून गेले. पाच भाऊ आणि पाच बहिणींचे कुटुंब चालविण्यासाठी त्याच्या वडिलांना खूप संघर्ष करावा लागला.