एक्स्प्लोर
अखेर यशवंत सिन्हा यांचा भाजपला रामराम!
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे.
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारवर प्रचंड नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर सिन्हा यांनी हा निर्णय जाहीर केला.
मित्रपक्षांच्या नाराजीचा सामना करत असलेल्या भाजपला घरातूनच मिळालेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
यापुढे कुठलंही राजकीय पद स्वीकारणार नाही. देशासाठी राष्ट्रमंचाची स्थापना करु अशी घोषणा यावेळी यशवंत सिन्हा यांनी केली. बिहारच्या पाटणामध्ये आयोजित कार्यक्रमात यशवंत सिन्हा बोलत होते.
कोण आहेत यशवंत सिन्हा?
- यशवंत सिन्हा हे झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघाचे माजी खासदार आहेत.
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थ आणि परराष्ट्र मंत्रीपद सांभाळलं आहे.
- यशवंत सिन्हा तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले.
- सध्या त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मोदी सरकारमध्ये नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आहेत.
मोदींच्या नाकी दम आणण्यासाठी यशवंत सिन्हांच्या नव्या हालचाली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement