एक्स्प्लोर
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं रायपूर मधील रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होणार आहेत.

रायपूर : छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ९ मे ला रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. अजित जोगी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विट वरुन दिली आहे. अजित जोगी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. अजित जोगी यांना लोकसेवा करण्याचा छंद होता. या प्रेमापायी त्यांनी नोकरशहा आणि राजकीय नेत्याच्या रुपात अपार मेहनत घेतली. विशेषकरुन आदीवासी समाजातील लोकांच्या आयुष्यात बदल व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
अजित जोगी यांचा थोडक्यात परिचय२० वर्षीय युवा छत्तीसगढ़ राज्य के सिर से आज उसके पिता का साया उठ गया।केवल मैंने ही नहीं बल्कि छत्तीसगढ़ ने नेता नहीं,अपना पिता खोया है।माननीय अजीत जोगी जी ढाई करोड़ लोगों के अपने परिवार को छोड़ कर,ईश्वर के पास चले गए।गांव-गरीब का सहारा,छत्तीसगढ़ का दुलारा,हमसे बहुत दूर चला गया। pic.twitter.com/RPPqYuZ0YS
— Amit Jogi (@amitjogi) May 29, 2020
- जन्म तिथी - 29 एप्रिल 1946
- जन्म स्थान - बिलासपूर छत्तीसगड
- इतिहास - सामान्य कुटुंबात जन्म. अजित जोगी लहानपणापासून प्रतिभावान होते. अभ्यासात नेहमीच अग्रेसर असायचे.
- 1968 मध्ये त्यांनी मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी, भोपाळकडून मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवून अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयीन दिवसात जोगी यांची आपल्या विभागातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
- 1967 मध्ये प्रशासन अभियंता महाविद्यालय, रायपूर (छत्तीसगड) मध्ये प्राध्यापक (1967-68) कार्यरत होते.
- 1974 मध्ये अजित जोगी यांची भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली.
- 1974 ते 1986 पर्यंत मध्य प्रदेशातील सिधी, शाहडोल, रायपुर आणि इंदौर जिल्ह्यांमध्ये 12 वर्षे सेवा करुन सर्वात जास्त काळ सेवा देणारे म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये रेकॉर्ड आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























