Richest Billionaires: गौतम अदानींचा नवा विक्रम! जगातील श्रीमंतांची यादी जाहीर, मुकेश अंबानींना कितवं स्थान?
फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत.
Forbes Richest Billionaires: फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात श्रीमंत (Richest Billionaires) लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh ambani) हे 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. तर भारतातील ते सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी (Gautam adani) हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 84 अब्ज डॉलर आहे. परंतू, गेल्या पाच वर्षात अदानी यांच्या संपत्तीत सर्वात वेगाने वाढ झाली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 865 टक्क्यांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात गौतम यांच्या संपत्तीत मुकेश अंबीनी यांच्या संपत्तीपेक्षा अधिक वेगानं वाढ झाली आहे.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 66 अब्ज डॉलरची वाढ
फोर्ब्सने रिअल-टाइम अब्जाधीशांच्या क्रमवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, मुकेश अंबानी यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून 2019 ते 2024 दरम्यान त्यांची संपत्ती 132 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 50 अब्ज डॉलर होती, जी 2024 मध्ये 116 अब्ज डॉलर झाली आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत 75 अब्ज डॉलरची वाढ
गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. 2019 मध्ये, अदानी समूहाच्या अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 8.7 अब्ज डॉलर्स होती. जी 2024 मध्ये वाढून 84 अब्ज डॉलर झाली आहे. म्हणजेच या काळात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 75.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 865.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक वाढ अदानी यांच्या संपत्तीत झाली आहे.
शिव नाडर हे देशातील तिसरे श्रीमंत व्यक्ती
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या क्रमवारीनुसार, एचसीएलचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 36.8 अब्ज डॉलर आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 14.6 अब्ज डॉलर्स इतकी होती. म्हणजे गेल्या पाच वर्षांत त्याच्या संपत्तीत 152 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिलीप सांघवी 26.7 बिलियन डॉलरसह चौथ्या स्थानावर आहेत. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला 21.3 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या: