एक्स्प्लोर
Advertisement
भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांची वज्रमूठ
मोदी हे शेतकरी विरोधी आहेत. त्यांनी घटनात्मक संस्थांचा ऱ्हास केला. देशात अघोषित आणीबाणी आली आहे. मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केला, असे घणाघाती शाब्दिक हल्ले आज कोलकात्यातील विरोधकांच्या या मेळाव्यातून पंतप्रधान मोदींवर करण्यात आले.
कोलकाता: 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र वज्रमूठ बांधली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकाता येथे भाजप विरोधकांना एकत्र आणणारी ‘भारतीय एकता सभा’ आयोजित केली. ही सभा भाजपविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
या सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, फारुख अब्दुल्ला, शरद यादव, अरविंद केजरीवाल, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल अशा विविध पक्षाची नेतेमंडळी उपस्थित होती. या विरोधकांसह भाजपचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा हे देखील महारॅलीला उपस्थित होते. या सभेत सर्वच विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
मोदी हे शेतकरी विरोधी आहेत. त्यांनी घटनात्मक संस्थांचा ऱ्हास केला. देशात अघोषित आणीबाणी आली आहे. मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केला, असे घणाघाती शाब्दिक हल्ले आज कोलकात्यातील विरोधकांच्या या मेळाव्यातून पंतप्रधान मोदींवर करण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकाच मंचावर आले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात भारतीय एकता सभेचं आयोजन केलं होतं. ही सभा भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठीचा नवा प्रयत्न असल्याचं मानलं जातं आहे.
ममता यांनी आयोजित केलेल्या या सभेत देशभरातील 22 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले. यात देशभरातील प्रादेशिक पक्षांचा सहभाग अधिक आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र या सभेला गैरहजर राहिले. मात्र काँग्रेसकडून मल्लिकार्जून खर्गे, अभिषेक मनु सिंघवी उपस्थित होते. विरोधकांसह भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हादेखील उपस्थित राहिले.
मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली : ममता बॅनर्जी
मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली आहे. भाजप भगाओ - देश बचाओ या नाऱ्याला प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तसेच पंतप्रधान पदाचा आमचा उमेदवार निवडणुकीनंतर घोषित केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. राजकारणात शिष्टता असते मात्र भाजप त्याचे पालन करत नाही. जे भाजपसोबत नाहीत त्यांना चोर समजले जाते. आपल्याला एकत्रित येऊन काम करायला हवे, असेही बॅनर्जी म्हणाल्या.
धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले : अब्दुल्ला मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारतातील एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत रहायचे आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देशासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात असून आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपाला संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.West Bengal CM Mamata Banerjee at Opposition rally in Kolkata: Modi govt is past its expiry date and in the coming days, a new dawn will descend. We will work together and it's a promise. pic.twitter.com/ItO9bcpe0Q
— ANI (@ANI) January 19, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement