एक्स्प्लोर

चारा घोटाळा : लालूंसह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष

2018 मध्ये म्हणजे पुढील वर्षी 3 जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना शिक्षा सुनावली जाईल.

रांची (झारखंड) : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे, तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला. लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जण दोषी ठरले आहेत, तर जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत. वाचा : चारा घोटाळा नेमका काय आहे? 2018 मध्ये म्हणजे पुढील वर्षी 3 जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना शिक्षा सुनावली जाईल. तोपर्यंत पोलिसांनी लालूंसह इतर दोषींना ताब्यात घेतले असून, त्यांची कोर्टातूनच थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. चारा घोटाळा नेमका काय आहे? चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. 1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत. आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. यात लालूंनी 90 लाख रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे. सर्व खटले एकत्रित चालवण्यास कोर्टाचा नकार चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले होते. चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. सरयू राय हे सध्या झारखंडमधील भाजप सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री आहेत. 2014 साली ते पश्चिम जमशेदपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. चारा घोटाळा बाहेर काढल्याने ते प्रकाशझोतात आले होते. संबंधित बातम्या : चारा घोटाळा : मागासवर्गीय असल्याने न्यायाची आशा : लालू चारा घोटाळ्याचा फैसला, लालूंना शिक्षा की सुटका?

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Noida Bus Fire : 'आईला सोडून जाणार नाही', जळत्या बसमधून बाहेर पडण्यास मुलाचा नकार; मायलेकाचा अंत, अंगठीवरून पटली ओळख; वडिलांचा आक्रोश, म्हणाले, 'मृत्यू डोळ्यासमोर दिसताना...'
'आईला सोडून जाणार नाही', जळत्या बसमधून बाहेर पडण्यास मुलाचा नकार; मायलेकाचा अंत, अंगठीवरून पटली ओळख; वडिलांचा आक्रोश, म्हणाले, 'मृत्यू डोळ्यासमोर दिसताना...'
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! संपापूर्वी बँक कर्मचारी संघटनांनी घेतला मोठा निर्णय, कधी मिळणार पगार? 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! संपापूर्वी बँक कर्मचारी संघटनांनी घेतला मोठा निर्णय, कधी मिळणार पगार? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Raj Thackeray Gyanesh Kumar: राज ठाकरेंची मोठी घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढणार
राज-उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढणार
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
Embed widget