एक्स्प्लोर

Farmers Protest | लाल किल्ल्यावर फडकवलेला ध्वज नेमका कोणता? निशान साहिबबद्दल सर्वकाही

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर पोहोचलेल्या आंदोलकांनी फडकावलेला ध्वज हा खलिस्तानचा असल्याचा दावा काहींनी केला तर काही जण हा ध्वज म्हणजे निशान साहिब असल्याचं सांगत आहेत. जाणून घेऊया निशान साहिबबद्दल सर्वकाही...

नवी दिल्ली : 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून विविध सीमांमधून राजधानी दिल्लीत प्रवेश केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याचदरम्यान काही शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी तिथे एक ध्वज फडकावला. या ध्वजावरुन लोकांच्या मनाता विविध शंका उपस्थित झाल्या आहेत. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला ध्वज हा खलिस्तानचा असल्याचा दावा काहींनी केला तर काही जण हा ध्वज म्हणजे निशान साहिब असल्याचं सांगत आहेत. तसंच आंदोलकांनी तिरंगा काढून त्याच्या जागी दुसरा ध्वज लावलेला नाही, असंही अनेकांनी म्हटलं आहे.

कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली नियोजित होती. कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघु आणि गाझीपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश केला. परंतु आंदोलक नियोजित मार्गावरुन हटले आणि ही रॅली हिंसक बनली. परिणामी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, लाठीमार करावा लागला. काही शेतकरी आयटीओ इथल्या दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर जमले तर काही जण लाल किल्ल्यावर पोहोचले. यातल्या काही जणांनी खांबावर चढून तिथे निशान साहिब फडकावला. जाणून घेऊया निशान साहिबचा संपूर्ण इतिहास

Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम : शरद पवार Delhi Violence Update | शेतकरी ट्रॅक्टर मोर्चातील हिंसाचारात 86 पोलीस जखमी, अनेकांवर FIR दाखल

निशान साहिब म्हणजे काय? निशान साहिब हा सिख धर्मियांचा पवित्र ध्वज आहे. हा त्रिकोणी ध्वज कापडी किंवा रेशमपासून बनलेला असतो. याच्या टोकाला रेशमची लटकन असते. या ध्वजाच्या मधोमध खंडाचं (तलवार) चिन्ह देखील असतं. या चिन्हात दोन तलवार आणि चक्र असतं. खंडाचा रंग निळा असतो. हा ध्वज भगव्या रंगाच्या कपड्याने गुंडाळलेल्या स्टीलच्या खांबावर चढवलेला असतो. शीख धर्मियांचा विश्वास आहे की खंडा हे एक शक्तिशाली साधन आहे जे सत्याला खोट्या गोष्टींपासून वेगळे करु शकते. असंही म्हटलं जातं की गुरु गोविंद सिंह यांनी खंडा गोड पाण्यात ढवळून त्यामधून अमृत तयार केलं होतं.

निशान साहिब हे खालसा पंथाचं पारंपरिक चिन्ह समजलं जातं. गुरुद्वाराच्या टोकावर किंवा उंचीवर हा ध्वज फडकत असल्याने तू दूरुनच पाहता येऊ शकतो. बैसाखीच्या शुभ मुहूर्तावर हा खाली उतरवला जातो. दूध आणि पाण्याने तो पवित्र केला जातो. निशान साहिबचा भगवा रंग फिका पडल्यास त्याऐवजी नवा ध्वज लावला जातो. शीख समाजात निशान साहिबचं फारच महत्त्व असल्याने तो सन्मानाने ठेवला जातो.

निशान साहिबचा इतिहास सुरुवातीला निशान साहिबचा रंग लाल होता. परंतु नंतर याचा रंग बदलून पांढरा केला. काही काळाने तो भगवा रंगाचा करण्यात आला. 1709 मध्ये सर्वात आधी गुरु हरगोविंद जी यांनी अकाल तख्तवर भगव्या रंगाचा निशान साहिब फडकवला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget