एक्स्प्लोर
विवाहसोहळ्यात साध्वीचा गोळीबार, महिलेचा मृत्यू, चार जखमी
करनाल : हरियाणाच्या करनालमध्ये एका साध्वीने लग्न सोहळ्यात उत्साहाच्या भरात गोळीबार केला. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर आरोपी साध्वी देवा ठाकूर आणि तिचे सर्व सुरक्षारक्षक पसार झाले आहेत. त्यांच्यावर हत्येचा आरोप आहे.
करनालमधील सावित्री पॅलेसमध्ये लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वत:ला साध्वी असल्याचं सांगणारी ही महिला चार गनमॅनसह लग्नात पोहोचली होती.
महिलेचा रुग्णालयात मृत्यू
डान्स फ्लोअरवर जातात साध्वी देवाने तिच्या बॅगमधून पिस्तुल काढली आणि गोळीबार केला. यावेळी साध्वीच्या गनमॅननेही फायरिंग सुरु ठेवली. या ठिकाणी लहान मुलंही असतील, याचं त्यांना भानही नव्हतं. या गोळीबारात पाच जण जखमी झाले. त्यापैकी जखमी महिलेने रुग्णालयात प्राण सोडले.
पोलिसांनी या सगळ्यांविरोधात आर्म्स अॅक्ट आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे साध्वी देवा?
हत्येचा आरोप असलेली 26 वर्षीय देवा ठाकूर करनामध्येच आश्रम चालवते. तसंच हिंदू महासभेची ती माजी उपाध्यक्षही होती. सोशल मीडियावर साध्वी देवा ठाकूरचे असे फोटो आहेत, ज्यात ती बंदुकांसह दिसत आहे. इतकंच नाही तर तिला सोन्याच्या दागिन्यांचा आणि लक्झरी गाड्यांचाही शौक आहे. याआधी ती वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होती. पण आता हत्येच्या आरोपात अडकल्यानंतर ती साथीदारांसह पसार झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement