Firecracker Rules: देशातील 'या' राज्यांमध्ये फटाके फोडल्यास भरावा लागेल दंड! विविध राज्याचे काय नियम? जाणून घ्या
Firecracker Rules: दिवाळी दरम्यान फटाके फोडल्याने होणाऱ्या प्रदुषणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. हेच प्रदूषण रोखण्यासाठी राज्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
Firecracker Rules: दिवाळी (Diwali 2022) म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्याचा उत्सव. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके (Firecrackers) फोडले जातात. दिवाळी (Diwali 2022) सण अगदी तोंडावर आला असून कोरोनाचे (Corona) निर्बंध उठल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सण उत्साहात साजरे केले जात आहेत. मात्र दिवाळी दरम्यान फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, प्रदुषणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. हेच प्रदूषण रोखण्यासाठी राज्यांनी पूर्ण तयारी केली आहे. या दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये फटाक्यांवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे, फक्त मोजकेच फटाके जाळण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही राज्यांनी फटाके फोडण्यासाठी कालमर्यादाही निश्चित केली आहे. जाणून घ्या भारतात फटाके वाजवण्याबाबत विविध राज्यांमध्ये काय नियम आहेत?
'या' राज्यांनी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतातील विविध राज्यांनी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. देशाची राजधानी दिल्लीत दिवाळीत फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिल्लीत फटाके विक्री आणि जाळण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. हरियाणा आणि ओडिशा सरकारनेही फटाक्यांवर बंदी घातली आहे. चंदीगड यूटी प्रशासन सलग दुसऱ्या वर्षी फटाक्यांवर बंदी घालत आहे. यासोबतच गेल्या वर्षी कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्येही फटाक्यांवर बंदी जाहीर करण्यात आली होती. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारनेही अॅडव्हायजरी जारी करून फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय?
सर्वोच्च न्यायालयाने आठवड्यापूर्वी म्हटले होते की, दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन प्रत्येक राज्याने करावे, सुप्रीम कोर्ट सणाच्या विरोधात नाही, पण मानवी जीव धोक्यात घालून उत्सव साजरा करू देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दीप प्रज्वलन करून किंवा कोणताही आवाज न करता उत्सव साजरा केला जाऊ शकतो.
एनजीटीची 18 राज्यांना नोटीस
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) 4 नोव्हेंबर 2020 रोजी कर्नाटक आणि तामिळनाडूसह 18 राज्यांना फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी नोटीस बजावली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार, एनजीटीने म्हटले आहे की या राज्यांतील 122 शहरांमधील हवेची गुणवत्ता अनुकूल रेषेच्या खाली आहे. एनजीटीच्या या सूचनेनंतर दिल्लीसह 6 राज्यांनी नोव्हेंबरमध्ये फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
'या' फटाक्यांवर बंदी
लवंगी बार आणि नागगोळ्यांवर बंदी आहे.
आर्सेनिक, लिथियम, शिसे, पारा, बेरियम आणि अॅल्युमिनियम असलेल्या फटाक्यांना बंदी
संबंधित बातमी