एक्स्प्लोर

अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान, अमेरिकेला गेल्याने अर्थसंकल्पाला मुकणार?

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तडकाफडकी अमेरिकेला रवाना झाले आहेत. नियमित तपासणीसाठी अरुण जेटली रविवारी अमेरिकेला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'द वायर'च्या वृत्तानुसार, "अरुण जेटली यांच्या मांडीमध्ये सॉफ्ट टिश्यू कॅन्सरचं निदान झालं आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून तो शरीराच्या इतर भागात जलद पसरु शकतो. अमेरिकेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून जेटलींच्या कॅन्सरबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय काहीसा कठीण आहे, कारण मागच्याच वर्षी 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. आता जर किमोथेरपी केली तर त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. तसंच "किडनी ट्रान्सप्लांटनंतर उद्भवलेल्या अडचणींमुळे शस्त्रक्रिया न करता त्यांना लगेचच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल," असं जाणकारांचं मत आहे. दुसरीकडे, दोन आठवड्यांच्या खासगी सुट्टीसाठी अमेरिकेला जात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. अर्थसंकल्प कोण मांडणार? 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. निवडणुकीमुळे हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. परंतु अर्थमंत्री अरुण जेटली अमेरिकेला रवाना झाल्याने त्यांच्या गैरहजेरीत अर्थसंकल्प कोण मांडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारला हा मोठा धक्का समजला जात आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे ते डायलिसीसवर होते. यानंतर 14 मे रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान अरुण जेटली सुट्टीवर असताना, रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. यानंतर 23 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी अर्थ मंत्रालयाचा पुन्हा ताबा घेतला होता. पण प्रकृतीच्या कारणास्तव मागील वर्षी एप्रिलमध्ये दहाव्या भारत-ब्रिटेन आर्थिक तसंच आर्थिक संवादासाठी लंडनमध्ये जाऊ शकले नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाMahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Embed widget