एक्स्प्लोर
Advertisement
जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश
अटलजींच्या बालपणापासून राजकीय जीवनात ते सक्रिय असतानाचा काळ 'युगपुरुष अटल' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे
मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘युगपुरुष अटल’ हा चित्रपट वर्षअखेरीस प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी अटलजींच्या जन्मदिवशीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.
मयांक पी श्रीवास्तव हे या सिनेमाचं दिग्दर्शन, तर स्पेक्ट्रम मूव्हीजचे रणजीत शर्मा हे निर्मिती करणार आहेत. 'हा सिनेमा अटलजींच्या आयुष्याच्या सर्व पैलूंना स्पर्श करेल. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा असेल.
अटलजींच्या बालपणापासून राजकीय जीवनात ते सक्रिय असतानाचा काळ दाखवण्यात येईल, असं दिग्दर्शक म्हणाले होते. या चित्रपटाचा कालावधी सव्वा दोन तासांचा असेल. याचं बजेट तब्बल 50 कोटी रुपयांचं आहे.
मी अटलजींसोबत काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करण्याचं माझं स्वप्न होतं. ते आता सत्यात उतरताना दिसत आहे, असं निर्माता रणजीत शर्मा म्हणाले होते. दुर्दैवाने अटल बिहारी वाजपेयींच्या हयातीत हा सिनेमा रीलिज झाला नाही.
या सिनेमाला बप्पी लहरी संगीत देणार आहेत, तर गाण्यांमध्ये अटलजींनी लिहिलेल्या कवितांचा समावेश असेल. अटलजींचं व्यक्तित्व सिनेकहाणीत बांधणं अवघड आहे, असं सिनेलेखक बसंत कुमार यांनी सांगितलं.
या सिनेमात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा वाजपेयींच्या 94 व्या वाढदिवशी म्हणजेच 25 डिसेंबर 2018 रोजी रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस होता.
अटलजींसोबतच पं. जवाहरलाल नेहरु, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी यांच्याही व्यक्तिरेखा चित्रपटात असतील.
दुसरीकडे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात राम अवतार भारद्वाज हे अटल बिहारींची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement