एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप
उत्तर प्रदेशातील 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप गुरुवारी करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. तर त्यांचा गौरव केल्याचं सांगितलं. तसेच आपल्या सरकारने 86 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील 7574 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप करण्यात आलं आहे. यानंतर आता 5 सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रभारी मंत्र्यांद्वारे कर्जमाफीची पत्रे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील.
लखनऊच्या स्मृती पार्कमध्ये कर्जमाफी पत्राचं वाटप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, अर्थमंत्री राजेश अग्रवाल, कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, आम्ही त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. उलट त्यांचा गौरवच केला आहे. गेल्या 15 वर्षांत राज्यात केवळ जातीचं राजकारण झालं. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिला राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.''
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''आम्ही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मंत्रिमंडळानेही सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचाच घेतला. यासाठी केंद्र सरकारच्या अनुरुप एक योजना तयार केली. यापूर्वी शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं वेळेत मिळत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी खतांच्या किमती कमी केल्यानंतर, जवळपास 70 लाखाहून जास्त शेतकऱ्यांची पडताळणी करुन, पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.''
ते पुढे म्हणाले की, ''शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्यानं काम करत आहोत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं लक्ष्य आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्याला अडतीतून मुक्त केलं. यातून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान परत केला आहे.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement