(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Protest : शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आणखी 1 शेतकऱ्याचा मृत्यू, 3 पोलिसांचाही मृत्यू, अनेक जण जखमी
Farmer Protest : टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेतकरी आंदोलनातील हा पाचवा मृत्यू आहे.
Farmer Protest : आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या 'दिल्ली चलो' (Delhi Chalo) शेतकरी आंदोलनाने आता हिंसक वळण घेतल्याचं समजतंय. आज आंदोलनाचा 11 वा दिवस असून या आंदोलनात आणखी एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तर हरियाणा पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया' ने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, खनौरी येथे एका आंदोलकाचा मृत्यू आणि अनेक पोलीस जखमी झाल्याने बुधवारी दोन दिवस आंदोलन थांबवण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी पत्रकारांना सांगितले की, पुढील रणनीतीबाबत शुक्रवारी संध्याकाळी निर्णय घेतला जाईल.
"शेतकरी आंदोलनातील हा पाचवा मृत्यू"
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेतकरी आंदोलनातील हा पाचवा मृत्यू असून, दर्शन सिंह असे मृताचे नाव आहे, ते 62 वर्षांचे होते. ते पंजाबमधील भटिंडा येथील अमरगढ गावातील रहिवासी होते. दर्शन सिंग हे 13 फेब्रुवारी 2024 पासून ते खनौरी सीमेवर राहत होते. दर्शन सिंग यांच्या मृत्यूबाबत शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी ANI वृत्तसंस्थेला माहिती दिली, ते म्हणाले, दर्शन सिंह हे शेतकरी आंदोलनातील पाचवे शहीद आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.
#WATCH | Patiala, Punjab | Farmer leader Sarwan Singh Pandher speaks on the death of a farmer.
— ANI (@ANI) February 23, 2024
He says, "He was at the Khanauri border and is the fourth martyr of this farmers' agitation. He has been identified as Darshan Singh (62), he died of a heart attack. Compensation… pic.twitter.com/m61OcrZUcL
सुमारे 20 पोलीस कर्मचारी जखमी
अंबाला पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार 13 फेब्रुवारी 2024 पासून शेतकरी संघटनांकडून शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या संदर्भात लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस प्रशासनावर दगडफेक करून गोंधळ घालण्याचे प्रयत्न रोज होत आहेत. या काळात सरकारी व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आंदोलनादरम्यान सुमारे 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले, 1 पोलीस कर्मचाऱ्याला ब्रेन हॅमरेज, तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. असं निवेदनात म्हटंलय.
NSA ची कारवाई होणार
कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेत्यांवर NSA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली. पोलिसांच्या निवेदनानुसार, 'गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कलम 2(3) राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 (NSA कायदा) अंतर्गत शेतकरी संघटनांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची प्रक्रिया राबवत आहे. असं म्हटंलय.
हेही वाचा>>>