एक्स्प्लोर

ज्योतिष निघाला 18 कोटींच्या नकली नोटांचा मालक, नोकराच्या चोरीमुळे भांडाफोड

मुरलीकृष्ण 2017 पासून विजयवाडा शहरातून 'भक्तिनिधि' नावाची वेबसाईट चालवतो. त्या माध्यमातून तो ज्योतिषी आणि रत्नांचा विक्रेता म्हणून काम करतो. साक्षी टीव्ही, टीव्ही 5 यासारख्या टीव्ही चॅनेल्सवर त्याचे कार्यक्रमही असायचे.

हैदराबाद : हैदराबादमधील एका ज्योतिषाच्या घरातून 18 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्वत: ला ज्योतिषीआणि रत्नांची विक्री करणारा मुरलीकृष्ण शर्मा ज्याला लोक ज्योतिष मानायचे तो बनावट नोटा विक्रेता निघाला. याप्रकरमी पोलिसांनी पोलिसांनी मुरलीकृष्ण याच्यासह एकूण 7 आरोपींना अटक केली आहे.

ज्योतिषी मुरलीकृष्ण शर्मा याने हैदराबादच्या रचकोंडा पोलिसात तक्रार दिली होती की, त्याचे मौल्यवान रत्ने चोरीला गेले आहेत. राचाकोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलिस तपासात आणि सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर असे आढळले की घरफोडी करणारा त्याच्याकडे काम करणारा पवन होता. पवनने मुरलीकृष्णाच्या खोलीत 12 कोटींच्या भरलेल्या दोन पिशव्या पाहिल्या आहेत.

राचकोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनने मुरलीकृष्णाचे नातेवाईक नागेंद्र प्रसाद व चार जणांनी हैदराबादच्या बांदलागुडा येथील मुरलीकृष्णाच्या घरात चोरीची योजना आखली होती. त्यांनी नोटांनी भरलेल्या पिशव्या चोरल्या आणि आंध्र प्रदेशला फरार झाले, जेणेकरुन पोलीस त्यांना पकडू शकू नयेत. त्यांच्या कारला त्यांनी बनावट नंबर प्लेट लावली होती.

चोटूपालजवळ पोहोचताच त्यांनी पैशांनी भरलेली बॅग उघडली, त्यानंतर त्यामध्ये बनावट नोटा भरल्याचं त्याच्या लक्षात आलं. नोटांच्या 16 बंडलवर 2000 रुपयांच्या नोटा होत्या तर आत सर्व बनावट नोटा होत्या. त्यांनी तेथे बनावट नोटांच्या दोन्ही पिशव्या पेटवून दिल्या आणि पवन 32,000 रुपयांच्या असली नोटांसह आपल्या गावी गेला.

या संपूर्ण प्रकाराची पोलीस चौकशीत माहिती मिळताच पोलिसांनी मुरलीकृष्णाच्या घराची तपासणी केली. यात त्यांना 17.72 कोटींच्या 2000 रुपयांच्या नकली नोटा सापडल्या. यासह पोलिसांनी 6.32 लाख रुपये देखील जप्त केले आहेत.

पोलिस तपासात असे आढळले आहे की मुरलीकृष्ण 2017 पासून विजयवाडा शहरातून 'भक्तिनिधि' नावाची वेबसाईट चालवतो. त्या माध्यमातून तो ज्योतिषी आणि रत्नांचा विक्रेता म्हणून काम करतो. साक्षी टीव्ही, टीव्ही 5 यासारख्या टीव्ही चॅनेल्सवर त्याचे कार्यक्रमही असायचे. 2019 मध्ये त्याने नूरुद्दीन नावाच्या व्यक्तीबरोबर बनावट नोटांच्या हवालाचा व्यवसाय सुरू केला. त्याने मंगलागिरी येथे बँकेच्या अधिकाऱ्यांसह 90 कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होतीय. जानेवारी 2020 मध्ये त्याला तुरूंगात डांबण्यात आले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये तो जामिनावर सुटल्यानंतर हैदराबादच्या बंडलागुडा भागात भाड्याने घर घेऊन राहत होता आणि त्याच्या बनावट नोटांचा काळाधंदा करत होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMahadik on Satej Patil: सतेज पाटलांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे, धनंजय महाडिकांचा आरोपAkola Amit Shah : अकोल्यातून अमित शाह यांचा ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलBachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Manoj Bajpayee : शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Embed widget