एक्स्प्लोर

सावधान! पाकिस्तानात छापलेल्या बनावट नोटा बांगलादेशमार्गे भारतात

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या रू. 2000 च्या नव्या नोटांच्या सहजासहजी बनावट बनवता येणार नसल्याचा दावा करण्यात आला असला तरी तो फोल ठरला आहे. पाकिस्तानात बनवलेल्या दोन हजार रूपयांच्या नव्या नोटा बांगलादेशमार्गे भारतात पाठवल्या जात असल्याचं आता उघड झालंय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील खुल्या बॉर्डरचा फायदा घेऊन या बनावट नोटा भारतात पाठवल्या जात असल्याचंही उघड झालंय. दोन हजार रूपयांच्या बनावट नोटेसाठी स्मगलर्सला फक्त 400 ते 600 रूपये द्यावे लागतात. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि एनआयए यांच्या संयुक्त कारवाईत बांगला देशमार्गे भारतात येणाऱ्या अनेक बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सर्वात अलीकडची जप्ती अगदी चार दिवसांपूर्वीची आहे. बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पश्चिम बंगालमधल्याच मालदा येथील अझीजुर रहमान याच्याकडून मुर्शिदाबादमध्ये दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्याच्याकडे दोन हजारांच्या तब्बल 40 नोटा होत्या. एनआयएने त्याची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे मिळालेल्या नोटा या पाकिस्तानात छापलेल्या असल्याची माहिती मिळाली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय या बनावट नोटांची छपाई करते. या नोटा बांगलादेशमार्गे भारतात पाठवल्या जात असल्याची माहितीही अझीजुर रहमानकडून मिळाली. बनावट नोटांच्या छपाईच्या दर्जानुसार त्याची खरी किंमत ठरते. म्हणजे सदोष छपाई असलेली किंवा थोड्या प्रयत्नाने 2000 ची नोट डुप्लीकेट असल्याचं ओळखता आलं तर त्यासाठी 400 रूपये द्यावे लागतात, तर अतिशय काळजीपूर्वक छपाई केलेल्या म्हणजेच बनावटपण सहजासहजी ओलखू न येणाऱ्या 2000 च्या नोटेसाठी 600 रूपये पडतात. तपास अधिकारी आणि नोटा छपाईतील तज्ञ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या दोन हजाराच्या नोटेत असलेल्या 17 सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी 11 सहजपणे कॉपी करता येतात. बीएसएफ आणि एनआयए तसंच स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बनावट नोटांच्या कागदाची क्वालिटी मात्र अतिशय हलक्या दर्जाची असल्याचं निदर्शनास आलं आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या दोन हजारच्या नोटेचं पहिलं डुप्लीकेट व्हर्जन डिसेंबर महिन्यातच पकडण्यात आलं होतं. त्यानंतर 22 जानेवारी आणि 4 फेब्रुवारीलाही बनावट नोटांची बांगलादेशमार्गे येणारी खेप पकडण्यात यश आलं होतं. काही जाणकारांच्या मते रद्द करण्यात आलेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये जे सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, तेवढीच दोन हजार रूपयांच्या नव्या नोटेतही आहेत. त्यापेक्षा एकही नवीन सुरक्षा वैशिष्ट्याची भर घालण्यात आलेली नाही, पश्चिम बंगालमधील सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनच्या काही अधिकाऱ्यांच्या मते रू. 2000 च्या नोटा एवढ्या वेगाने छापण्यात आल्या की त्यामध्ये काही नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेशच करता आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget