Rameshwaram Cafe Explosion : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जखमी; घटना CCTV मध्ये कैद
Rameshwaram Cafe Explosion : सुरुवातीला गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा असा संशय होता, मात्र अग्निशमन विभागाने ही शक्यता फेटाळून लावली आणि घटनास्थळी एक बॅग सापडल्याचे सांगितले.
Rameshwaram Cafe Explosion : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwaram Cafe Explosion) आज (1 मार्च) झालेल्या स्फोटाची दृश्ये कॅफेमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे. दुपारच्या वेळी याठिकाणी खूप गर्दी असते. कर्नाटकचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी सांगितले की, स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू असून आम्हाला एफएसएल टीमकडून अहवाल मिळाल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असेही ते म्हणाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन कर्मचारी आणि सात ग्राहक जखमी
सुरुवातीला गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा असा संशय होता, मात्र अग्निशमन विभागाने ही शक्यता फेटाळून लावली आणि घटनास्थळी एक बॅग सापडल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, फॉरेन्सिक टीम स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामध्ये दोन कर्मचारी आणि सात ग्राहक होते, असे पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
पोलिसांना बॅगचा स्फोट झाल्याचा संशय आहे. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी आहेत. ज्या व्हाईटफिल्डमध्ये हा स्फोट झाला त्या कॅफेमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला काही संशयास्पद हालचाल आहे का हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे. कर्नाटकचे डीजीपी आलोक मोहन, बंगळू पोलिस आयुक्त बी दयानंद आणि इतर वरिष्ठ अधिकारी परिसराची पाहणी करत आहेत. डीजीपी म्हणाले की, एनआयए आणि आयबीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
स्फोट नेमका कशाने झाला?
अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक टीएन शिवशंकर यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1.08 वाजता अग्निशमन विभागाला कॅफेमध्ये गॅस लिकेज होऊन आग लागल्याचा फोन आला. आमचे अधिकारी आणि टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा आग किंवा ज्वाला नव्हती. एक बॅग जी एका महिलेच्या मागे पडली होती ती इतर सहा जणांसह बसली होती. त्या बॅगमधील काही वस्तूंमुळे स्फोट झाला असावा असा संशय आहे. ही बॅग कोणाची होती हे स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. गॅस सिलिंडरची गळती झाल्याची शक्यता अधिकाऱ्यानी नाकारली आहे. चहा-कॉफीसाठी वापरल्या जाणाऱ्या किचनचीही तपासणी करण्यात आली पण त्यातूनही कोणतीही गळती झालेली नाही. आमच्या प्राथमिक तपासणीनुसार घटनास्थळी कोणत्याही सिलिंडरमधून गॅस गळती नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या