एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Exclusive: सोनाली फोगाटला जबरदस्ती दिलेले 7 वेळा ड्रग्स; CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा

Sonali Phogat : सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने सात वेळा ड्रग्ज देण्यात आले होते.

Sonali Phogat Case : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकाने आपल्या आरोपपत्रात म्हटलंय, सोनाली फोगट यांना MDMA ड्रग्ज जबरदस्तीने देण्यात आले होते. एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा एका प्लॅस्टिकच्या बाटलीतून सोनाली फोगट यांना ड्रग्ज देण्यात आले होते. 

सीबीआयच्या आरोपत्रानुसार, सोनाली फोगट, सुधीर सांगवान आणि सुखविंदर हे तिघेही कर्लीज क्लबवर (Curlies Restaurant) होते. त्यावेळी सुधीर आणि सुखविंदर त्यांना प्लॅस्टिकच्या बाटलीतून ड्रग्ज प्यायला देत होते. नुकताच या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सुधीर आणि सुखविंदरने सोनालीला सात वेळा ड्रग्ज दिल्याचे आढळून आले आहे. 

आरोपपत्रानुसार, कर्लीज कल्बमध्ये 22 ऑगस्टच्या रात्री  01:09, 01:10, 01:13, 01:19, 01:22, 01:25 आणि 01:27 असं सात वेळा सुधीर आणि सुखविंदरने सोनालीला MDMA ड्रग्ज जबरदस्तीने दिलं आहे. सीबीआयने कर्लीज क्लबमधील एका वेटरला याप्रकरणाचा साक्षीदार बनवलं आहे.  

वेटर सरधन दास यांनी सीबीआयला दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी मी रात्रीच्या शिफ्टला असून माझी ड्युटी पहिल्या मजल्यावर होती. त्यावेळी सोनाली सुधीरसोबत डान्स करत असल्याचं मी पाहिलं आहे. दरम्यान सुधीर आणि सुखविंदर तिला ड्रग्ज पिण्यास भाग पाडत होते. 

सीबीआयने आपल्या आरोपपत्रात 104 जणांना साक्षीदार बनवलं आहे. पण अद्याप सोनाली फोगटच्या हत्येमागील कारण काय होतं हे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. सोनालीच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सुधीर आणि सुखविंदरला आरोपी बनवले आहे. मात्र या दोघांनीदेखील सोनालीची हत्या कोणत्या उद्देशाने केली हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

ड्रग्जमुळेच बिघडली सोनाली यांची प्रकृती

सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या हत्येप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आलेली आहे. सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, कर्लीज हॉटेलचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये ड्रग्स आढळले होते. सोनाली फोगाट ज्या रूममध्ये होत्या, त्याच रुमच्या बाथरूममध्ये सिन्थेटिक ड्रग्स मिळाले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली. ड्रग्जमुळेच सोनाली यांची प्रकृती बिघडली होती. सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. यानंतर त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले होते. ही खासगी कार हॉटेलमधीलच एका व्यक्तीची होती.

संबंधित बातम्या 

Sonali Phogat Case: सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी सीबीआयने नोंदवला गुन्हा, पथक उद्या गोव्याला जाणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget