एक्स्प्लोर
Advertisement
'मिस्टर सीएम, कट्टपाने बाहुबलीला का मारलं?'
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'टॉक टू AK' हा कार्यक्रम आजपासून सुरु झाला. पहिल्या दिवशीच्याच कार्यक्रमाला जनतेने उत्सफुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी मागवण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या १५ हजारांवर पोहचली आहे.
अरविंद केजरीवालांनी www.talktoak.com या वेबसाईटवर प्रश्न मागवले होते. या वेब पार्टलवर तब्बल १५ हजार नागरिकांनी आपले प्रश्न विचारले. केजरीवालांना एकाने विचारले की, तुम्ही जाहिरातींवर इतका प्रश्न का करता? तर एकाने विचारले की, तुम्ही जनतेला इतके मुर्ख का बनवता? काहींनी तर मुख्यमंत्र्यांकडून चित्रपटाच्या रिव्हीयूची मागणी केली आहे. तर काहींनी कॅन्सरवरील उपचार विचारला आहे. विशेष म्हणजे, रुपेश नामदेव या व्यक्तीने कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं? अशी विचित्र शंका विचारली आहे.
दरम्यान, आजच्या आपल्या पहिल्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले. दिल्ली सरकारमधील जलमंत्री कपिल मिश्रा यांनी भाजपला कोपरखळी मारत, ''दुसऱ्याची 'मन की बात' ऐकून कंटाळला असाल, आता मुख्यमंत्र्यांना तुमची 'मन की बात' सांगा, असे म्हटले आहे.
केजरीवालांचे मोदींच्या पावलावर पाऊल, 'मन की बात'प्रमाणेच 'टॉक टू AK'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement