एक्स्प्लोर

नाणार प्रकल्पाला हळूहळू सगळे समर्थन करतील : धर्मेंद्र प्रधान

“नाणार प्रकल्प भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचा आहे. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातल्या रोजगाराला, औद्योगिकीकरणला मोठी चालना मिळेल.”

नवी दिल्ली : नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा आहे. महाराष्ट्रातल्या रोजगाराला आणि औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाणार प्रकल्प महाराष्ट्रासह भारताच्या हिताचा “नाणार प्रकल्प भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचा आहे. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातल्या रोजगाराला, औद्योगिकीकरणला मोठी चालना मिळेल.”, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. हळूहळू सगळेजण नाणारला समर्थन करतील शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे, यासंदर्भात ज्यावेळी एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, “मला विश्वास आहे, सर्वसहमतीने हळूहळू सगळेजण या प्रकल्पाचं समर्थन करतील.” तसेच, शिवसेनेचा विरोध हळूहळू मावळेल, अशी आशाही धर्मेंद्र प्रधानांनी व्यक्त केली. विरोध डावलून नाणारचा मार्ग मोकळा शिवसेनेचा विरोध डावलून फडणवीस सरकारने रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर काल नवी दिल्लीत सह्या झाल्या. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली असून सविस्तर बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandigram : मोठी बातमी, ममता बॅनर्जींनी नंदिग्राममध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यालाच अटक, मिलन प्रधान यांच्या अटकेचं कारण काय?
ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार, नंदिग्राममध्ये काँग्रेस उमेदवाराला अटक, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या घडामोडी
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Pakistan Mosque Blast : पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा
पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget