एक्स्प्लोर

अवघ्या 1 मिनिटात गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका

मुंबई : आजचा दिवस जगभरातल्या शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. अवघा एक मिनिट आणि तब्बल 4 लाख कोटीचा फटका, असं चित्र आज मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळालं. ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला. त्यात मुंबई शेअर बाजाराचीही मोठी पडझड झाली.   प्री ओपनिंग सेशनला, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला. याचदरम्यान अवघ्या एक मिनिटात गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचं नुकसान झालं.   जगभरातही पडझड   युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय बीबीसी, स्काय न्यूज व इतर वृत्तवाहिन्यांनी जाहीर करताच भारताबरोबरच जगभरातल्या शेअरबाजारा मोठी घसरण दिसून आली. जपानचा बाजार निक्केई तब्बल आठ टक्क्यांनी घसरला. या ठिकाणी आणखी घसरण होऊ नये म्हणून शेअर बाजारातले व्यवहारही काही काळ थांबवण्यात आले. पण दुसरीकडे याचा फायदा जपानी करन्सी येनला होऊन पौंडच्या तुलनेत येन मजबूत झाला.   हाँगकाँगचा शेअर बाजार दोन टक्क्यांनी घसरला. हँगसँगमध्ये तब्बल 1000 अंशांची घट नोंदवली गेली. चिनी बाजारही 50 अंकांनी घसरला.   भारतीय शेअर बाजारातही १ हजार अंशांची घसरण नोंदवली गेली.   काय आहे युरोपियन युनियन?
  • 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे.
  • युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी करू शकतात आणि तिथं युरो हे एकच चलन वापरलं जातं.
  • 1973 मध्ये ब्रिटननं या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं.
  • पण बदललेल्या आर्थिक परिस्थितीत, खास करून निर्वासितांचे लोंढे वाढल्यावर युरोपियन युनियनमधून वेगळं होण्याच्या मागणीनं ब्रिटनमध्ये जोर धरला आहे. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा म्हणजे ब्रेक्झिटचा निर्णय घेतला, तर त्याचे पडसाद जगभर उमटतील.
  ब्रिक्झिटचे भारतावर होणारे परिणाम
  • युरोपियन युनियन ही भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतीय कंपन्यांसाठी ब्रिटन हे युरोपचं प्रवेशद्वार बनलं आहे.
  • जवळपास 800 हून अधिक भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची 6 ते 18 टक्के कमाई ब्रिटनमधून होते.
  • ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्यानं करार करावे लागतील. त्यामुळं खर्चात वाढ तर होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावं लागेल.
  • ब्रेक्झिटमुळे युरो आणि पाऊंड या चलनांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यात डॉलरचा भाव वधारू शकतो. अशा परिस्थितीत रुपयाचं मूल्य घसरल्यानं कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीला मोठा फटका बसेल. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानं पर्यायानं भारतात महागाई आणखी वाढेल. तर जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम होईल.
  • युरोपियन युनियनमधून वेगळं झाल्यास ब्रिटनचा पैसा वाचेल, पण जवळपास दहा लाख ब्रिटिश नागरिकांना नोकरी गमवावी लागू शकते.
  • हे सारं काही एका झटक्यात होणार नाही, तर त्यासाठी दोन वर्षांचा कालवधी लागेल. पण निकाल काहीही लागला, तरी ही जनमत चाचणी युरोपचं आणि जगाचंही भवितव्य निश्चित करू शकते.
संबंधित बातम्या

युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार

ब्रिटनमधील जनमत चाचणीकडे जगाचं लक्ष 

ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार का, जगाचं लक्ष ब्रिक्झेटकडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 23 January 2025Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सWalmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget