एक्स्प्लोर

Epstein File India: एपस्टीन फाईल्समधील नेत्यांचे महिलांसोबतचे फोटो बाहेर आले, आता भारताच्या राजकारणात उलथापालथ होणार का? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खरा ठरणार का?

Epstein File India: आज १९ डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात एखादी मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा आता देशभरात रंगली आहे.

Epstein File India: आज १९ डिसेंबर. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या राजकारणाचे लक्ष आज अमेरिकेकडे लागले आहे. कुख्यात उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे ‘एपस्टीन फाईल्स’ (Epstein File) आज अमेरिकेच्या संसदेत खुली होणार आहेत. या खुलाशांमधून समोर येणारी माहिती जगाला हादरवणारी असेल आणि भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. आज १९ डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात एखादी मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा आता देशभरात रंगली आहे.

Epstein File India:  एपस्टीन फाईल्स नेमक्या काय आहेत?

अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याने जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, ई-मेल्स, फोटो आणि संपर्कांची माहिती ‘Epstein Files Transparency Act’ अंतर्गत सार्वजनिक केली जाणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाला ही कागदपत्रे उघड करण्यासाठी 19 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

Epstein File India:  भारताचे राजकारण हादरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दावा केला आहे की, एपस्टीन फाईल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे आहेत. या खुलाशांमुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल, असा तर्क त्यांनी मांडला आहे. याआधीही त्यांनी असा दावा केल्याने मोठी चर्चा झाली होती आणि ते आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही टीका करत ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

Epstein File India: एपस्टीनची आत्महत्या की हत्या? संशय कायम

जेफ्री एपस्टीनने 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. मात्र, “एपस्टीनने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या झाली असण्याची दाट शक्यता आहे,” असा गंभीर संशय पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आपण जे काही बोलत आहोत ते अमेरिकन संसदच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, त्यामुळे या खुलाशांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Epstein File India: अमेरिकेत नवे फोटो, दिग्गजांची नावे चर्चेत

दरम्यान, अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील डेमोक्रॅट्सनी एपस्टीनच्या इस्टेटमधून 68 नवे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये बिल गेट्स, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, विचारवंत नोम चॉम्स्की, ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत. तसेच, डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि बिल गेट्स यांचेही काही फोटो समोर आले आहेत. मात्र, या फोटोंमध्ये कोणतीही अल्पवयीन मुलगी दिसून येत नाही. 

Epstein File India: भारताशी संबंधित संदर्भ, पण थेट आरोप नाहीत

नुकत्याच उघड झालेल्या ई-मेल्समध्ये 2019 साली एपस्टीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Epstein Email), अमेरिकन राजकीय रणनीतीकार स्टीव्ह बॅनन यांच्याशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी, भाजप नेते मंत्री हरदीपसिंग पुरी आणि भारतीय वंशाचे लेखक दीपक चोप्रा यांची नावेही संदर्भ म्हणून आढळतात. मात्र, हे सर्व संदर्भ कथित भू-राजकीय किंवा सामाजिक संपर्कांपुरते मर्यादित आहेत. लैंगिक शोषण किंवा मानवी तस्करीच्या गुन्ह्यांशी त्यांचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

Epstein File India: आज १९ डिसेंबर, काय होणार?

आज एपस्टीन फाईल्समधील पुढील खुलासे होत असताना पृथ्वीराज चव्हाणांचे दावे खरे ठरणार का? भारताच्या राजकारणात खरोखरच मोठी उलथापालथ होणार का? की हे केवळ राजकीय अंदाज आणि चर्चेपुरतेच मर्यादित राहणार या सगळ्यांची उत्तरे आजच्या खुलाशांनंतरच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आता अमेरिकेकडे वळले आहे.  

आणखी वाचा 

 

Bill gates Epstein Photos: एपस्टीन फाईल्स उघडली, अब्जाधीश उद्योगपती बिल गेटस् यांचे मुलींसोबतचे फोटो व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Latur Crime: लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
CM Yogi Meets PM Modi: सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
Embed widget