एक्स्प्लोर

 Election Commission Of India : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगचा नवा फंडा, बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क

 Election Commission Of India :  बोगस मतदान रोखण्यासाठी  निवडणूक आयोगकडून अनेक नवे प्रयोग करण्यात आले आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.

 Election Commission Of India :  बोगस मतदान  रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे.  तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. 

बोगस मतदान रोखण्यासाठी  निवडणूक आयोगकडून अनेक नवे प्रयोग करण्यात आले आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो.  

आगामी लोकसभा निवडणुकीत तंत्र अवलंबण्याची शक्यता

या वर्षी मिझोरम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्याच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेचच  लोकसभा निवडणुका होणाप आहे. जर विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही प्रणाली लागू करण्यात येईल. या नव्या प्रणालीमुळे बोगस मतदान, दुबार मतदानाला आळा बसेल. तसेच लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील घोटाळे थांबतील. कारण नखांवर लेझरची खूण केल्याने पुन्हा मतदानास आल्यास व्यक्ती पकडला जाईल. ईव्हीएममधील कॅमेरा दुसऱ्यांदा येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकाऱ्यास पाठवेल. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल. 

डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याची पद्धत 

मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीला (पहिले बोट) शाई लावण्याची पद्धत आहे.  मतदान बुथवर तुमची ओळख पटवून तुम्हाला प्रवेश मिळतो. ईव्हीएमवर बटन दाबून प्रत्यक्ष मतदान करण्यापूर्वीच पुसली न जाणारी शाई तुमच्या डाव्या तर्जनीला लावली जाते. त्यानंतर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचं निशाण तुमच्या नावासमोर घेतलं जातं. त्यानंतर तुम्हाला मतदान करता येतं. ही शाई तुमच्या बोटावर पुढचे काही दिवस टिकून राहते. मतदान करण्यापूर्वी पोलिंग ऑफिसर तुमच्या डाव्या तर्जनीवर शाई तर लावलेली नाही ना, हे तपासून बघतो. जर शाई असेल, तर याचा अर्थ मतदाराने आधीच मतदान केलं आहे. साहजिकच ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी अपात्र ठरते. 

हे ही वाचा :

काय सांगता! एक लाख मतदारांचे चेहरे एकसारखेच, निवडणूक विभागाकडून पडताळणी सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Embed widget