Election 2022 : प्रचार रॅली, सार्वजनिक सभांचं काय? निवडणूक आयोगाकडून आज आदेश जारी होण्याची शक्यता
Election 2022 Guidelines : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूक प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्याबाबत आदेश जारी केले जाऊ शकतात.
Election 2022 Guidelines : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूक प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्याबाबत आदेश जारी केले जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने रॅली आणि सार्वजनिक सभांवरील बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवली होती. नुकतीच कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
मात्र वाढत्या कोरोनामुळं आयोगानं आधी 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती, नंतर ती 22 जानेवारीपर्यंत कायम ठेवली होती.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. सुरुवातीला आयोगानं 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली. नंतर ती आज 22 तारखेपर्यंत वाढवली. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले होते. त्यामुळे सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आयोगाकडून आज या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. परंतु उत्तरप्रदेशसारख्या राज्यात विना रॅली निवडणुकांचा प्रचार कसा होणार यासाठी काही पक्ष चिंतेत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबधित बातम्या :
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Election Guidelines : ओमायक्रॉनचं संकट, त्यात 5 राज्यात निवडणुका, नो रॅली, नो सभा, गाईडलाईन्स नेमक्या काय?
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुका 2024 च्या दृष्टीनंही महत्त्वाच्या , कुठल्या पक्षासाठी कशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे?