एक्स्प्लोर
दिल्ली-फैजाबाद एक्स्प्रेसचे डबे घसरले, 50 प्रवासी जखमी

नवी दिल्ली : दिल्लीहून फैजाबादला जाणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले आहेत. उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यात झालेल्या अपघातात सुमारे 50 प्रवाशी जखमी झाले. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. अपघाताच्या वेळी मोठा आवाज आल्याचं रेल्वेतील प्रवाशांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे इतर ट्रेन मेरठ आणि कानपूर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























