(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eid Al Fitr 2023 Date: अरब देशांमध्ये दिसला चंद्र, जाणून घ्या भारतात कधी साजरी होणार ईद?
रमजानचा महिना चंद्र दर्शनानंतर सुरू होतो, त्याचप्रमाणे रमजानचा शेवट देखील चंद्र दर्शनानेच होते. रमजान या सणासाठी बाजारात मोठी गर्दी उसळल्याची पाहायला मिळतेय.
भारतात रमजान ईदचा (Ramadan Eid) आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अरब देशांमध्ये ईदचा चंद्र दिसला आहे. अरबमध्ये 21 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. तर भारतात 22 एप्रिलला ईद साजरी करण्यात येण्याची शक्यता आहे. रमजान महिन्यात 29 किंवा 30 दिवस रोजा पाळला जातो, त्यानंतर ईदचा सण साजरा केला जातो. ज्याला ईद-उल-फितर (Eid-ul-Fitr) असेही म्हणतात. ईदचा सण मुस्लिम समाजातील लोकांसाठी सर्वात मोठा सण असतो . या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. रमजानचा महिना चंद्र दर्शनानंतर सुरू होतो, त्याच प्रमाणे रमजानचा शेवटदेखील चंद्र दर्शनानेच होते. रमजान(Ramadan) या सणासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट या ईदने होतो. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात.
इस्लाम धर्मामध्ये असं मानलं जातं की, रमजानमध्ये दयेचे दरवाजे उघडले जातात. या महिन्यात केल्या जाणाऱ्या नमाजाचे पुण्य कैक पटींनी वाढते. रमजान महिन्याचे 10-10 दिवसांनी तीन भाग केले जातात आणि त्याला अशरा असं म्हणतात. पहिल्या अशरामध्ये असे मानले जाते की अल्लाह दया करतो. दुसऱ्या अशरामध्ये पापांची क्षमा असते, तर तिसरा अशरा नरकातील आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी असतो. अरब देशांमध्ये चंद्र दिसल्याने अरब आणि आखाती देशांमध्ये ईदच्या दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्यात येणार आहे. भारतात 22 एप्रिलला ईद साजरी होणार आहे.
भारतात शुक्रवारी ईद साजरी करता येणार नाही कारण यादिवशी भारतात 29 वा रोजा असणार आहे. 29 किंवा तिसावा रोजा पूर्ण केल्यानंतरच ईद साजरी करता येते. दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली आहे. शेवया, मिठाई, नवीन कपडे, भेटवस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. भारतात रमजानचा पवित्र महिना शुक्रवार, 24 मार्च (जुम्मा) पासून सुरू झाला. इस्लामिक कॅलेंडरमध्ये रमजान हा नववा महिना आहे. या महिन्यात उपवासाच्या काळात पाणीही प्यायले जात नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Happy Eid-ul-Fitr 2023 : रमजान ईदच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश!