Vasundhara Din : वसुंधरा दिनानिमित्त नॅशनल जिओग्राफिकचे 'वन फॉर चेंज'; बदल घडवणाऱ्या सहा युवकांच्या सहा भन्नाट कथा
One For Change : या सहा लघुपटांमधून, जगामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा युवकांच्या असाधारण कथा दाखवण्यात येणार आहेत.

मुंबई: येत्या 22 एप्रिल रोजी, वसुंधरा दिनाच्या निमित्ताने नॅशनल जिओग्राफिककडून 'वन फॉर चेंज' हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सहा तरुणांनी जग बदलण्यासाठी कशा पद्धतीने सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला याच्या प्रेरणादायी कहाण्या समोर आणण्यात येत आहेत. या सहा जणांमध्ये बोधिसत्व खंडेराव आणि हाजिक काझी या दोन महाराष्ट्रातील युवकांचा समावेश आहे हे विशेष.
ज्या सहाजणांच्या कहाण्या सांगण्यात येणार आहेत ती सर्वजण 9 ते 17 या वयोगटातील आहेत. आपल्या लहान लहान प्रयत्नातून त्यांनी जगात मोठा बदल घडवण्याचा निश्चय केला आहे. गेल्या वर्षभरात 'वन फॉर चेंज' ने 30 बदल घडविणाऱ्यांची दमदार कहाणी जिवंत करून सांगितली आणि देशभरातील 256 मिलियन प्रेक्षकांपर्यंत ही मोहीम पोहोचवली. हा प्रयत्न सुरू ठेवत, हे काम आता त्यांच्या तरुण सहकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असून आता अशा सहा तरुण प्रतिभावान बदल घडविणाऱ्यांवर प्रकाश झोत टाकण्यात येणार आहे.
या तरुणांनी आपल्या जिज्ञासू आणि कल्पक मनाने ग्रह संवर्धनासाठी हुशार उपाय शोधून काढलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केलेला आहे. प्रत्येक चित्रपट यातील बहुतेक स्थितिस्थापक बदल घडविणाऱ्यांनी स्वीकारलेली दृष्टी, प्रयत्न आणि उद्यमशील तंत्र जिवंत करून दाखविणार आहे, ज्याचा उद्देश ग्रहाच्या बाबतीत जागरूक असलेल्या प्रेक्षकांना ते एक पाऊल उचलण्यासाठी आणि 'बदल करण्यासाठी एक बना' अशाकरिता प्रेरित करणे आणि प्रोत्साहित करणे असा आहे.
जबरदस्त बदल घडवून आणणारे सहा युवा प्रेरणादायी कथा,
बोधिसत्व खंडेराव – 15 वर्षांचा बोधिसत्व आणि त्याची आई शाळा, महाविद्यालये, स्वयं-मदत गट, ग्रामपंचायत यांना भेटी देऊन वनरोपण आणि वृक्षलागवडीविषयी जनजागृती करतात.
प्रसिद्धी सिंह – पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 विजेती, 10 वर्षीय प्रसिद्धीने 'प्रसिद्धी फॉरेस्ट' ची स्थापना केली आणि देशभरात एक लाखाहून अधिक झाडे लावण्यास मदत केली.
हाजीक काझी - समुद्रातील प्लास्टिक कचरा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका स्वप्नवीराने एक बुद्धिमान प्रतिकृती (प्रोटोटाइप) जहाज तयार केले जे प्लास्टिक कचरा ओढून घेऊ शकेल आणि महासागर स्वच्छ करू शकेल.
थारागई आराथना – जनजागृती आणि प्लास्टिक कचऱ्यापासून सागरी जीवांचे रक्षण करण्याचे उद्देश्य घेऊन 8 वर्षांची थारागई स्वच्छता मोहीम राबवून प्लॅस्टिक कचऱ्यापासून समुद्राचे पात्र स्वच्छ करण्याची मोहिमेसाठी काम करत आहे.
रिद्धिमा पांडे – 14 वर्षीय युवा कार्यकर्तीचा विश्वास आहे की हवामान कृतीवर परिणाम करण्यासाठी आणि हवामानाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटनेविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जागतिक नेत्यांकडे केलेल्या तक्रारीत सामर्थ्य असते.
अंकिथ सुहास राव – अंकिथचा असा विश्वास आहे की, जर योग्य प्रश्न योग्य लोकांना आणि योग्य व्यासपीठावर संबोधित केले गेले तर लहान प्रश्नांमुळे मोठे बदल घडविता येतात.
नॅशनल जिओग्राफिकच्या टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर आणि डिस्ने स्टार नेटवर्कवरील मनोरंजन वाहिन्यांवर याचे प्रीमियर केले जाणार असून हे चित्रपट एकत्रित फॉलोअर्स 10 मिलियनपेक्षा जास्त असणाऱ्या नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या सोशल मीडिया हँडल्सवर सुद्धा प्रदर्शित केले जाणार आहेत.
#OneForChange मोहिमेअंतर्गत, नॅशनल जिओग्राफिक 22 एप्रिल 2023 पासून सहा प्रभावी लघुपटांचा प्रीमियर करणार आहे आणि यामध्ये युवा प्रतिभावान बदल घडविणारे प्रमुख आकर्षण असतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
