एक्स्प्लोर

आता ड्रायव्हिंग लायसन्सही आधारला लिंक करावं लागणार

लवकरच वाहनचालकांना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करावं लागणार आहे.

मुंबई : बँक खातं, मोबाईल क्रमांक, पॅनकार्डनंतर आता सरकारनं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सला लिंक करण्याची तयारी चालवली आहे. डिजिटल हरियाणा समीट 2017 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. त्यामुळे लवकरच वाहनचालकांना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करावं लागणार आहे. “आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधारसोबत लिंक करण्यावर विचार करत आहोत. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी नुकतीच या विषयावर चर्चा केली आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल,” असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

शेअर बाजारातील व्यवहारांना आधार कार्ड बंधनकारक?

आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी तसंच जास्त रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. आता ड्रायव्हिंग लायसन्सही लिंक करण्यात येणार असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली. तुमचा नंबर आधार कार्डला लिंक करणं अनिवार्य सरकारच्या जवळपास सर्व योजनांच्या लाभांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. सोबतच बँक, आयकर रिटर्न यांसाठीही आधार कार्ड अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे.

81 लाख आधार कार्ड रद्द, तुमचं स्टेटस काय?

आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असण्याचे अनेक फायदे आहेत. आधार कार्ड असल्यास तुम्ही आयकर रिटर्न ऑनलाईन व्हेरिफाय करु शकता. मात्र त्यासाठी ओटीपीची गरज (वन टाईम पासवर्ड) असते. हा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर येतो. शिवाय ई-आधार डाऊनलोड करतानाही तुम्हाला ओटीपीची गरज लागते. मात्र मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल, तर ओटीपी न मिळाल्यामुळे ही महत्त्वाची कामं रखडतात. मोबाईल नंबर आधारशी लिंक कसा कराल? दोन परिस्थितींमध्ये तुम्हाला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करावा लागेल. एक म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करत असाल. किंवा तुमचा बदललेला मोबाईल नंबर आधार डेटामध्ये अपडेट करायचा असेल. पहिल्यांदाच मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी… तुम्हाला पहिल्यांदाच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ऑफलाईनच करावा लागेल. कारण बहुतांश ऑनलाईन व्यवहारांसाठी ओटीपीची गरज असते आणि तो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जातो. इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही पहिल्यांदाच लिंक करत असल्यामुळे ओटीपी पाठवला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊनच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल. आधार अपडेट किंवा करेक्शन फॉर्म घेऊन जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या (फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा). फॉर्म अचूकपणे भरा आणि त्यावर मोबाईल नंबर अपडेट करत असल्याचा उल्लेख करा. फॉर्म जमा करण्यासाठी आधार कार्डची फोटो कॉपी आणि ओळखपत्र (मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट) लागेल. (कोणती कागदपत्र लागतील ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा) आधार नोंदणी केंद्रामध्ये फॉर्म दिल्यानंतर बोटांच्या ठशांनी (बायोमेट्रिक्स) व्हेरिफिकेशन केलं जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी 2 ते 5 दिवस लागतात. मात्र UIDAI च्या हेल्पलाईनच्या मते यासाठी जास्तीत जास्त दहा दिवसही लागू शकतात. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी… आधार कार्ड डेटामध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑनलाईनही अपडेट करता येईल. तुमचा जुना नंबर चालू असेल तर नवीन नंबर ऑनलाईन लिंक करु शकता. मात्र जुना नंबर (जो बदलायचा आहे) बंद असेल तर ऑनलाईन अपडेट करता येणार नाही. कारण त्यासाठी लागणारा ओटीपी पहिल्यांदा लिंक केलेल्या नंबरवर पाठवला जाईल. aadhar https://uidai.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर आधार अपडेट टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाका, त्यानंतर ओटीपी मागवण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या अगोदरपासून लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला काय अपडेट करायची आहे, त्याचे पर्याय दिसतील. यामध्ये अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय निवडा. त्यामध्ये तुमचा नवीन (जो लिंक करायचा असेल तो) मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा.

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget