(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुरूलकरांनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये, गुप्तर अधिकाऱ्याचा मोबाईल एटीएसने घेतला ताब्यात
पाकिस्तानी महिलेचे व्हिडीओ पाहता यावेत म्हणून पुरवली भारताच्या क्षेपणास्त्रांची गुप्त माहिती पुरवल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: पुणे DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये सापडल्याचं स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब म्हणजे कुरुलकरने ब्रह्मोस, अग्नी आणि उपग्रहरोधी क्षेपणास्रांची माहिती पाकिस्तानाला पुरवल्याची बाब समोर आली आहे. कुरुलकरकडून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कुरुलकरच्या फोन कॉल यादीत एका अधिकाऱ्याचं नाव पुढे आलंय. त्यानंतर एटीएसने त्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे. तसेच अश्लिल व्हिडीओ पाहता यावेत म्हणून गोपनीय माहिती पुरवल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या तपासाची माहिती पंतप्रधान तसेच संबंधित विभागाला देण्यात आली आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याकडूनही अशीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न याच पाकिस्तानी महिला एजंटने केला होता, अशीही माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने कुरुलकरला पाकिस्तानी महिला एजंटला गोपनीय माहिती देण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर कुरुलकरकडून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कुरुलकरच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आलंय. त्यानंतर एटीएसने त्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे प्रत्यक्षात या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली का, याची माहिती महाराष्ट्र एटीएस घेत आहे.
अश्लिल व्हिडीओ पाहता यावेत म्हणून पुरवली भारताच्या क्षेपणास्त्रांची गुप्त माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने कुरूलकर यांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात एक मेसेज आला होता. मेसेज करणाऱ्या महिलेने ती लंडनची रहिवासी असल्याचे सांगितले होते. कुरूलकर यांनी देशासाठी केलेले काम पाहून ती त्यांच्या कामाची प्रशंसा केली. कुरुलकर यांनी चौकशीत सांगितले, "त्या पाकिस्तानी महिलेशी त्यांनी बोलणे वाढवले कारण वयाच्या 59 वर्षी त्यांनी एकटे वाटत होते. महिलेला क्षेपणास्त्राविषयी आवड होती. याची माहिती दिल्यास ती आपल्यासाठी काहीही करेल असे वाटले". पाकिस्तानी महिलेचे नग्न व्हिडीओ पाहता यावेत म्हणून पुरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
पाकिस्तानच्या 30 वर्षाच्या एजंटने अडकवले जाळ्यात, भेटण्यासाठी कुरूलकर जाणार होते लंडनला
पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) च्या एजंटने कुरुलकर यांना जाळ्यात अडकवण्यासाठी जारा दास गुप्ता असे नाव सांगितले. तसेच त्यांच्याशी अश्लिल चॅट वाढवले. कुरुलकर गेल्या वर्षी या महिलेला भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. कुरूलकर कामानिमित्त रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथून ते महिलेले भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु काही कारणामुळे त्यांचा रशियाचा दौरा रद्द झाला. ते लंडनला देखील गेले नाहीत. व्हिडीओ कॉल आणि चॅटवर ते एकमेकांच्या संपर्कात होते.
पंतप्रधान कार्यालयाला दिली माहिती
भारतीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार कुरुलकरांशी चॅट करण्यासाठी महिला जो क्रमांक वापरत होती त्याची सुरूवात +44 या क्रमांकाने होते. परंतु त्याचा आयपी अॅड्रेस हा पाकिस्तानचा होता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा अलर्टवर असून या संदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली आहे.