ORSचे जनक डॉ दिलीप महालानबीस यांचं निधन; कसं तयार केलं ओआरएस? ज्यामुळे डायरियावरील उपचारात झाली क्रांती
आपण जनरली अशक्तपणा आला, जुलाब, अतिसार थकवा आला की ओआरएस घेतोच. या ORSचा शोध लावणारे भारतीय संशोधक डॉ. दिलीप महालानबीस यांचं काल निधन झालं.
ORS Dr Dilip Mahalanabis passes away: ओरल रीहायड्रेशन सोल्यूशनचा सोपा अर्थ आपल्याला माहीत असेल. तो म्हणजे ORS. आपण जनरली अशक्तपणा आला, जुलाब, अतिसार थकवा आला की ओआरएस घेतोच. या ORSचा शोध लावणारे भारतीय संशोधक डॉ. दिलीप महालानबीस यांचं काल निधन झालं. 12 नोव्हेंबर 1934 रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या डॉ. महालानबिस यांनी जगभरातील रुग्णांसाठी प्रभावी उपाय शोधून काढला. या डॉ. महालानबीस यांनी काल कोलकात्यात जगाचा निरोप घेतला. त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे होते मात्र ते सरकारकडून देखील दुर्लक्षित राहिल्याचं दिसतंय.
अशक्तपणा आला, जुलाब वगैरे आजारामुळे शरीरातील पाणी कमी झालं तर डॉक्टर आपल्याला ORS (oral rehydration Solution) घ्यायला सांगतात. हे आपल्याला कुठल्याही औषध दुकानात अगदी सहज उपलब्ध होतं. आपण ते पाण्यात टाकून पितो आणि दोन मिनिटात आपल्याला बऱ्यापैकी आराम मिळतो. जगभरात वापरल्या जाणाऱ्या या ORSचे जनक डॉ. महालानबीस हे होते.
डॉ दिलीप महालानबीस हे एक भारतीय बालरोगतज्ञ होते. 1960 च्या मध्यात त्यांनी कोलकाता येथील जॉन्स हॉपकिन्स इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग येथे कॉलरा आणि इतर अतिसाराच्या आजारांवर संशोधन केले. 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान डॉ महालानबीस निर्वासितांच्या छावण्यांमध्ये काम करत होते. जेव्हा त्यांनी ओआरएसचा शोध लावला. या शोधाला द लॅन्सेटने '20 व्या शतकातील सर्वात महत्त्वाचा वैद्यकीय शोध' म्हटले होते.
1975 ते 1979 या काळात डॉ दिलीप महालानबीस यांनी कॉलरा नियंत्रणासाठी काम केले.1980 च्या दशकात, त्यांनी जिवाणूजन्य रोगांच्या व्यवस्थापनावरील संशोधनावर WHO सल्लागार म्हणून काम केले. डॉ दिलीप महालानबीस यांना कोलंबिया विद्यापीठाने बालरोगशास्त्रातील नोबेलच्या समान मानल्या जाणाऱ्या पोलिन पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकारकडून मात्र एवढं मोठं काम करणारा व्यक्ति दुर्लक्षितच राहिल्याचं दिसून येत आहे.
कसा लागला ओआरएसचा शोध?
1971 चे युद्ध सुरू झाले तेव्हा पूर्व पाकिस्तानातील लाखो लोकांनी भारतात आश्रय घेतला होता. या निर्वासित शिबिरांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नव्हते तसेच स्वच्छतेच्याही समस्या होत्या. यावेळी लोकांमध्ये कॉलरा आणि अतिसाराची लागण सुरु झाली. त्यावेळी डॉ दिलीप महालानबीस आणि त्यांची टीम बोनगाव येथे अशाच एका शिबिरात काम करत होती. डॉ. महालानबीस यांना माहित होते की साखर आणि मीठ यांच्या द्रावणामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढेल आणि माणसं वाचू शकतील. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमने पाण्यात मीठ आणि ग्लुकोजचे द्रावण तयार केले. ते मोठ्या ड्रममध्ये साठवण्यास सुरुवात केली. याच काळात अथक परिश्रमातून महालानबीस यांनी ओआरएसचा शोध लावला. त्यावेळी डब्ल्यूएचओच्या जिवाणू रोग युनिटचे प्रमुख डॉ धीमान बरुआ यांनी त्या शिबिराला भेट दिली आणि ORS च्या शोधाचं कौतुक करत या संशोधनाला प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )