एक्स्प्लोर
कुत्र्यांना मारा, सोनं मिळवा, केरळच्या एका संस्थेची अजब योजना
तिरुअनंतपुरम: केरळच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महानरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच ऑफर दिली आहे. 10 डिसेंबरपर्यंत राज्यातील जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या अधिकाऱ्यांला चक्क सोन्याची नाणी कमावण्याची ऑफर दिली आहे.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला आहे, तर 700जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यामुळे वाढत्या भटक्या कुत्र्यांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी, पलामधील थॉमस कॉलेजच्या ओल्ड स्टूडण्ट वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी यासाठी थेट महापालिका अधिकाऱ्यांनाच ऑफर दिली आहे.
दरम्यान, यापूर्वीही या संघटनेने भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी सर्वसामान्यांना कमी दरात एअर गन उपलब्ध करुन दिली होती.
''आम्ही राज्यातील ज्या महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे, त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बक्षीस देण्याची योजना बनवत आहोत. या योजनेनुसार, जे सर्वाधिक भटक्या कुत्र्यांच्या मुसक्या आवळण्याचे नेतृत्व करतील त्यांच्यासाठी ही लागू असेल. आमचा मुख्य उद्देश भटक्या कुत्र्यांपासून सर्वसामान्यांना संरक्षण मिळवून देण्याचा असल्याचे,'' या संघटनेचे महासचिव जेम्स पमबायकल यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement