Bisleri Tata Deal : आधीपासून पाण्याच्या व्यवसायात असलेले टाटा आता बिस्लेरी का खरेदी करताहेत? 'ही' आहेत प्रमुख कारणे
Bisleri Tata Deal : पाण्याच्या उत्पादनात असलेली देसातील अग्रगण्य कंपनी बिस्लेरी 6000 ते 7000 कोटींना टाटा ग्रृप विकत घेणार असल्याचे बोलले जात आहे.
Bisleri Tata Deal : देशातील सर्वात लोकप्रिय पाणी विकणारी बिस्लेरी विकली जाणार आहे. बेस्लेरी ही कंपनी उद्योगपती रतन टाटा यांचा टाटा ग्रृप घेण्याची शक्यका आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच बिस्लेरी कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी एका मुलाखतीदरम्यान या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे. परंतु, सध्या चर्चा होत आहे की, ज्या कंपनीने 2020 मध्ये तब्बल शंभर कोटी रूपयांचा नफा कमावला आहे, ती कंपनी अचानक कोणत्या कारणाने विकली जात आहे. शिवाय टाटा ग्रृप देखील आधीपासूनच या व्यवसायात आहे तरी देखील बिस्लेरीची खरेदी का करत आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
बिस्लेरी कंपनी 6000 ते 7000 कोटींना टाटा ग्रृप विकत घेणार असल्याचे बोलले जात आहे. रमेश चौहान यांनी नुकतीच इकॉनॉमिक्स टाईम्सला मुलाखत दिली. यात त्यांनी टाटांची कार्यसंस्कृती, त्यांचे नेतृत्व आणि व्यवसायाबाबत त्यांची प्रशंसा केली. त्यामुळे ही कंपनी टाटा खरेदी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाटा पहिल्यापासूनच पाण्याच्या व्यवसायात आहेत. तरी देखील त्यांना 7000 कोटी रुपये खर्च करून बिसलेरी ब्रँड विकत घ्यायचा आहे. टाटाकडे आधीपासूनच हिमालयन, टाटा कॉपर प्लस आणि टाटा ग्लुको प्लस सारखी उत्पादने आहेत. परंतु असे असून देखील ते बिस्लेरी घेण्यास उत्सुक आहे.
बिसलेरी ही पाण्याच्या व्यवसायातील सध्याच्या काळातील आघाडीची कंपनी आहे. टाटा बिसलेरी विकत घेण्यात यशस्वी झाले तर ती पॅकेज्ड वॉटर व्यवसायात अधिक मजबूत होईल.बिस्लेरीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, देशात पॅकेज्ड वॉटरची बाजारपेठ 20 हजार कोटी रूपयांची आहे. त्यापैकी 60 टक्के हिस्सा असंघटित आहे, ज्यामध्ये बिसलरीचा वाटा 32 टक्के आहे. अशा स्थितीत ही कंपनी टाटांनी खरेदीकेली तर बाजारातील टाटांचे वर्चस्व आणखी वाढू शकते.
टाटांकडे सध्या असलेली पाण्याची उत्पादने प्रीमियम विभागातील आहेत. हिमालय असो किंवा टाटा कॉपर, बिसलेरी टाटाची झाली तर कंपनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. बिस्लेरीच्या खरेदीनंतर टाटांचे वाटर प्रोफाइल आणखी मजबूत होणार आहे. टाटाच्या मालकीचे वॉटर ब्रँड हे प्रीमियम ब्रँड आहेत. टाटाच्या हिमालयन वॉटरची किंमत 50 ते 70 रुपयांपर्यंत आहे, तर ग्लुको प्लसच्या 200 मिलीची किंमत 10 रुपये आहे. अशा परिस्थितीत बिसलेरी टाटांची झाली तर टाटा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतील.
टाटाने बिस्लेरी विकत घेतल्यास ते बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात आणखी मजबूत होतील. बिस्लेरीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांचे देशात आणि परदेशात 4500 हून अधिक वितरक आणि 5000 हून अधिक वितरण ट्रॅक आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 220 कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे. शिवाय कंपनीची उलाढाल 2500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
टाटांनी बिस्लेरी विकत घेतल्यास टाटा भारतातील बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायावर राज्य करतील. मार्केट रिसर्च आणि अॅडव्हायझरी टेकसाई रिसर्चच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय 243 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 19315 कोटी रुपयांचा होता. असे मानले जाते की हा व्यवसाय 13.25 टक्केच्या CAGR ने वाढेल. अशा परिस्थितीत टाटांना देशात आणि परदेशात आपला पाण्याचा व्यवसाय वाढवण्याची चांगली संधी आहे. बिस्लेरीमध्ये 122 हून अधिक कार्यरत संयंत्रे आहेत. मिनरल वॉटरसोबतच, बिस्लेरी इंटरनॅशनल प्रीमियम वॉटर ब्रँड्स देखील विकते. इक्विटी रिसर्च फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की जर हा करार झाला तर पुढील आर्थिक वर्षात टाटाकंज्यूमर प्रोडक्ट्समध्ये महसूल आणि नफा 18 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. महसुलासह, बिस्लेरीच्या प्रवेशामुळे कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत होईल आणि बाजारात तिची पकड आणखी मजबूत होईल. विशेष म्हणजे बिस्लेरीचे मालक रमेश चौहान 82 वर्षांचे आहेत. आरोग्याच्या कारणांमुळे आणि उत्तराधिकारी नसल्यामुळे ते आपली कंपनी 6000 ते 7000 कोटींना विकण्याचा विचार करत आहेत.