एक्स्प्लोर
Advertisement
एचआयव्हीग्रस्ताच्या पत्नीशी अनैतिक संबंध, डॉक्टरची आत्महत्या
सुरत : सुरतमध्ये 44 वर्षीय होमियोपथी डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. डॉ. महेंद्र दलाल यांनी राहत्या घरी कीटकनाशकं प्राशन केल्यानंतर गळफास लावून घेतला. महिला रुग्णाशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं, संबंधित महिलेचा पती एचआयव्हीबाधित असल्याची माहिती आहे.
डॉ. दलाल यांची पत्नी रेश्मा यांनी सर्वप्रथम त्यांचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दलाल यांच्या घरात पोलिसांना कीटकनाशकाची बाटली आढळली, तर त्यांचा मृतदेह प्लास्टिकच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत होता. पोस्टमार्टम अहवालानुसार दलाल यांनी कीटकनाशकं प्राशन केल्यानंतर गळफास लावून घेतला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
डॉ. दलाल यांच्या लेटरहेडवर त्यांनी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीत डॉक्टरांनी आपली पत्नी रेश्मा, त्यांची दोन मुलं, त्यांच्या महिला पेशंटचा पती, तिची तीन मुलं आणि भावांना आत्महत्येस जबाबदार ठरवलं आहे.
डॉ. दलाल यांचे एका महिला रुग्णासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचंही उघड झालं. महिलेच्या मुलाने दोघांना रंगेहात पकडल्यामुळे डॉक्टरांच्या मनात आपली प्रतिमा मलीन होण्याची भीती निर्माण झाली. 42 वर्षीय महिलेचा पती एचआयव्हीबाधित असल्याची माहिती आहे.
आपल्या पतीच्या कृत्यांची माहिती आपल्याला असल्याचं डॉ. दलाल यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर आपल्यात मतभेद निर्माण झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कौटुंबिक जीवनातील तणाव आणि विवाहबाह्य संबंधांचा गुंता यातूनच डॉ. दलाल यांनी आयुष्य संपवलं असावं, असं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement