एक्स्प्लोर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीचा घोळ कायम, बैठकांवर बैठका होऊनही निवड रखडल्याने मंत्र्यांची नाराजी

प्रदेशाध्यक्ष पदासाठी दिल्लीतून नाना पटोले यांच्या नावावरच निश्चिती झाली होती, फक्त अधिकृत घोषणा बाकी होती. मात्र या निश्चितीला दोन आठवडे झाल्यानंतर ही नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने संभ्रम कायम आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचा विषय महिनाभरापासून रखडल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील यांनी या बदलासाठी निवडलेल्या कार्यपद्धतीबद्दलही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी खाजगीत बोलताना नापसंती दर्शवली आहे. तीन जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीत आले होते. पक्षश्रेष्ठींना राज्यात बदल करायचा असल्यास आपण स्वतःहून राजीनामा देण्यास तयार आहोत असे त्यावेळी थोरातांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती.

दुसर्‍या तिसर्‍या दिवशीच प्रभारी एचके पाटील यांनी मुंबईत पोहोचून मंत्री आणि आमदारांची मत जाणून घेतली होती. या सगळ्या चर्चेत नाना पटोले, राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी विचारात होती. हायकमांडचा कल नाना पटोले यांच्या बाजूने असला तरी राज्यात अनेक मंत्री सरकारच्या स्थिरतेसाठी तूर्तास विधानसभा अध्यक्ष बदलण्याच्या विरोधात होते. तरीही दिल्लीतून नाना पटोले यांच्या नावावरच निश्चिती झाली होती, फक्त अधिकृत घोषणा बाकी होती. मात्र या निश्चितीला दोन आठवडे झाल्यानंतर ही नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने संभ्रम कायम आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा जास्त काळ लांबत चालल्याने बाळासाहेब थोरात यांची नाराजी

मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी मंत्र्यांसोबत तास-तास बैठका करूनही हा प्रश्न तसाच भिजत ठेवला गेला आहे. तीन पक्षांचं सरकार असताना विधानसभा अध्यक्षांच्या बदलाचा प्रश्न प्रगल्भतेने हाताळला जात नसल्याची अनेक मंत्र्यांनी खाजगीत टिपणी केली. "बदलाची प्रक्रिया सुरु करण्याचे संकेत ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते. त्यामुळे ना धड सध्याच्या प्रदेशाध्यक्षांना काम करता येत आहे, ना नव्या अध्यक्षाला काही स्पष्टपणे कळतंय. त्यामुळे संघटनेत संभ्रम असल्याची स्थिती आहे" अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने एबीपी माझाकडे नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही : यशोमती ठाकूर

काँग्रेस हायकमांड नाना पटोले यांच्या नावावर ठाम राहिलं तर विधानसभा अध्यक्ष बदलाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. तीन पक्षांचा सरकार असल्याने त्यासाठी व्यवस्थित बोलणी करून हा प्रश्‍न हाताळावा लागेल अन्यथा सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न उद्भवू शकतो. आधीची जेवढी मतं सरकारच्या बाजून आहेत त्याच्यापेक्षा एखादं जरी मत कमी पडलं तरी सरकारसाठी तो नामुष्कीचा विषय ठरतो त्यामुळे ही प्रक्रिया दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊनच राबवावी लागेल, असंही या नेत्याने पुढे सांगितलं. काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रभारींनी मुंबईनंतर राज्य कार्यकारिणीत बदलाचे संकेत दिले होतेच, पण आता तो निर्णय किती वेगाने होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
Embed widget