एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : ऑक्टोबरमध्ये 3.30 रुपयांनी महागलं डिझेल; पेट्रोलच्या दरांनीही गाठला उच्चांक; एक लिटरचे दर काय?

Petrol and Diesel Price in India : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. डिझेलचे दर (Diesel Price) प्रति लिटर 35 पैशांनी तर पेट्रोलचे दर (Petrol Price) प्रति लिटर 30 पैशांनी महाग झालं आहे.

Petrol and Diesel Price in India Latest Updates : पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) मध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढिमुळं सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. तर डिझेलच्या किमतीमध्ये 35 रुपये प्रति लिटरनं वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याचं नावच घेत नाहीये. या महिन्यात सोमवारी, 4 ऑक्टोबर वगळता दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.  अशातच केवळ ऑक्टबर महिन्याच्या 10 दिवसांतच पेट्रोलची किंमत 2.80 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमत 3.30 रुपयांनी वाढली आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दरवाढिनंतर दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर 93.18 रुपयांवर पोहोचली आहे. 

या महिन्यात 2.80 रुपये महागलं पेट्रोल, तर डिझेलच्या दरांत 3.30 रुपयांची वाढ  

या महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल 25 पैशांनी महाग झालं होतं, तर डिझेलही 30 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली होती. अशातच डिझेलच्या किमतीतही सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली. 10 दिवसांत डिझेल 3.30 रुपयांनी महाग झालं आहे. 

देशातील प्रमुख महानगरांतील दर :

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली   104.44 93.18
मुंबई  110.38 101.00
कोलकाता  105.05 96.24
चेन्नई  101.76 97.56

पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? 

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 

देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजाविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजाविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजाविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजाविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Sanjay Raut: ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात घसरण की तेजी,मुंबईसह विविध शहरांतील दर जाणून घ्या?
सोने अन् चांदीच्या दरात घसरण की तेजी,मुंबईसह विविध शहरांतील दर जाणून घ्या?
Pune Accident: पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Donald Trump on H1B Visa : भविष्यात अमेरिकेचा नाद नकोच? 'फक्त इंजिनिअर्स नव्हे, तर...' आता H1B व्हिसावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका
भविष्यात अमेरिकेचा नाद नकोच? 'फक्त इंजिनिअर्स नव्हे, तर...' आता H1B व्हिसावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका
Embed widget