एक्स्प्लोर

आप आमदारावर जादूटोण्याचे गंभीर आरोप

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे आमदार देविंदर सहरावत अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यावर जादूटोणासारख्या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप केला असून, याची माहिती एका पत्राद्वारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दिली आहे.   पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून तिकीट वाटपाच्या बहाण्याने महिलांचे शोषण होत असल्याचा, आरोप देविंदर सहरावत यांनी केला होता. पण आता त्यांच्या वडिलांनीच देविंदर यांच्यावर जादूटोण्याच्या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप केल्याने स्वत: गोत्यात आले आहेत.   देविंदर यांचे वडील राम प्रकाश सहरावत यांनी आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य ठीक नसून त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हणले आहेत. वडिलांच्या आरोपांवर देविंदर यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.   दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या आमदारांवर रोज नवनवे आरोप होत आहेत. यापूर्वी केजरीवालांच्या मंत्रीमंडळातील माजी मंत्री संदीप कुमार यांचे सेक्स स्कॅण्डल समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या नंतर आता आप आमदार देविंदर सहरावत यांच्यावर जादूटोण्याच्या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप होत आहे.     जबलपूरमधून काळ्या जादूचे ट्रेनिंग घेतले:  राम प्रकाश पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राम प्रकाश यांनी केजरीवालांना लिहलेल्या पत्रात, ''2005 साली सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी देविंदर जबलपूरला गेले होते. त्यांनी तेथे काळ्या जादूचे ट्रेनिंग घेतले. काळ्या जादूचे ट्रेनिंग घेत असताना देविंदर यांना नैराश्याने ग्रासले. त्यांना परत आणण्यासाठी इतर दोन मुलांना जबलपूरमध्ये पाठवून रुग्णवाहिकेमधून आणावे लागले.'' यानंतर काहीकाळ दिल्लीतील विमहांस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.   संपत्तीसाठी देविंदरकडून जीवे मारण्याची: राम प्रकाश राम प्रकाश यांनी देविंदर सोबतचे आपले संबंध चांगले नसल्याचे सांगतानाच संपत्तीसाठी सुरु असलेल्या वादात देविंदरने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.   सैन्य दलातील कर्नल देविंदर देविंदर सहरावत केजरीवाल यांच्यासोबत सुरुवातीच्या काळापासून आहेत. सध्या ते बिजवासन मतदार संघातून आमदार आहेत. 2013 सालातही त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. देविंदर राजकारणात येण्यापूर्वी सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत होते.

महत्त्वाच्या बातम्या

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत राडा सुरूच, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत राडा सुरूच, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Embed widget