एक्स्प्लोर

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Nana Patekar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं निधन झालंय. दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये (Goa News) नाना पाटेकरांनी (Nana Patekar) अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नानांच्या अकाली एक्झिटनं मनोरंजनसृष्टी पोरकी झालीय. 

हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. 

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत 'नटसम्राट' हा सिनेमा विशेष गाजला.

खरं तर 'नटसम्राट' म्हटलं तर, जुन्या पिढीला रंगभूमीवरचे श्रीराम लागू आठवतात. पण, सिनेमे पाहून मोठे झालेल्या पिढीला, जर विचारलं तर मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर रुपेरी पडद्यावर 'नटसम्राट' मोठं करणारे नाना पाटेकरच उभे राहतात. 

करमणूक व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget