एक्स्प्लोर

Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 

Layoffs : Porsche ची मूळ कंपनी फॉक्सवॅगने जागतिक पातळीवर 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची तयारी सुरु केली आहे. पोर्शे देखील 9000 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.  

नवी दिल्ली : जर्मनीतील लोकप्रिय कार कंपनी फॉक्सवॅगनने 2030 पर्यंत जगभरात आणखी 50 हजार नोकऱ्या संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या यूनियन सोबत झालेल्या समझोत्यानुसार आणि मार्च 2026  पर्यंतच्या योजनांनुसार जवळपास 50 हजार पदं हळू हळू संपवण्यावर सहमती करण्यात आली होती. यासह काही कर्मचाऱ्यांसोबत स्वेच्छानिवृत्ती आणि निवृत्तीच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील झाल्या आहेत.  

आता दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर 2026 नुसार कंपनीच्या पर्यवेक्षणात्मक बोर्डानं आणखी 50 हजार नोकऱ्यांची कपात करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच कंपनीकडून जवळपास 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जाणार आहे. एकाच वेळी एक लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जाणार नाही. हा कंपनीच्या फ्युचर प्लान 2030 चा भाग आहे. कंपनी हळू हळू पुढील चार वर्षात मनुष्यबळात कपात करणार आहे. फॉक्सवॅगन सध्या संकटात असून 90 वर्षात पहिल्यांदा फेररचनेचा सामना करत आहेत.  

कंपनीसमोर मोठी आव्हानं

फॉक्सवॅगननं कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे याचा परिणाम कंपनीच्या एकूण 15 टक्के कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची कमी झालेली मागणी, अमेरिकन टॅरिफ, चिनी कार उत्पादकांकडून वाढलेली स्पर्धा याचा सामना करावा लागत आहे. फॉक्सवॅगन बाजारातील सद्यस्थितीपाहून त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि उत्पादनक्षमता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी कर्मचारी कपातीद्वारे त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फेररचनेच्या दिशेनं पावलं टाकत आहे.  

कंपनी कामगार कपात का करतेय?

फॉक्सवॅगन या कंपनीवर सध्या अनेक कारणांमुळं दबाव आहे. यूरोपमधील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत अपेक्षेप्रमाणं तेजी दिसत नाही. चीनच्या कंपन्यांकडून भक्कम स्पर्धक म्हणून स्थान निर्माण करण्यात आलं आहे. जर्मनीत उत्पादन खर्च अधिक आहे, याशिवाय अमेरिकन टॅरिफचा दबाव देखील कंपनीवर आहे.  

अमेरिकेनं यूरोपियन यूनियनकडून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरुन वाढवून 30 टक्के करण्यात आला आहे. फॉक्सवॅगनचे सीईओ ऑलिव्हर ब्लूम यांच्यामते अमेरिकन टॅरिफच्या नियमांनुसार कंपनीच्या वार्षिक ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 5 अब्ज यूरोचं थेट नुकसान होत आहे. फॉक्सवॅगनच्या तुलनेत अलिशान ब्रँड पोर्शेला टॅरिफमुळं अधिक नुकसान होत आहे. या अडचणींमुळं फॉक्सवॅगनकडून खर्चात कपात करण्यासोबत कामकाज अधिक कौशल्यपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.  

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
Modern Office Setup Cost : 100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget