एक्स्प्लोर

निवडणूक आयोजनाच्या धर्तीवर कोरोना लस वितरण प्रणाली विकसित करा, पंतप्रधान मोदींची सूचना

आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने सुरक्षित सामाजिक अंतर, मास्कचा वापर , नियमितपणे हात धुणे आणि स्वच्छता राखणे यासारखे कोविड प्रतिबंधात्मक उपाय सुरूच ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड -19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती , वितरण आणि व्यवस्थापन याचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी देशाची भौगोलिक व्याप्ती आणि विविधता लक्षात घेऊन लस उपलब्धता जलद गतीने सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. लस वाहतूक , वितरण आणि व्यवस्थापनातील प्रत्येक पाऊल कठोरपणे उचलण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यामध्ये शीतगृह साखळी, वितरण नेटवर्क, देखरेख यंत्रणा, आगाऊ मूल्यांकन आणि वेल्स, सिरिंज इत्यादी आवश्यक उपकरणे तयार करणे यांचा समावेश असावा.

आपण निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा देशात वापर करायला हवा, असेही त्यांनी निर्देश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, त्याच पद्धतीने लस वितरण आणि प्रशासकीय यंत्रणाचे नियोजन केले जावे. यात राज्ये, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा पातळीवरील अधिकारी, नागरी संस्था, स्वयंसेवक, नागरिक आणि सर्व आवश्यक क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग असावा. संपूर्ण प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मजबूत कणा असावा आणि व्यवस्थेची रचना अशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून आपली आरोग्य सेवा प्रणाली शाश्वत राहील.

कोविड रुग्णांच्या दररोजच्या संख्येत आणि वाढीच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. रुग्णसंख्येत घट झाल्याबद्दल आत्मसंतुष्ट न राहता सावधगिरी बाळगून महामारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने सुरक्षित सामाजिक अंतर, मास्कचा वापर , नियमितपणे हात धुणे आणि स्वच्छता राखणे यासारखे कोविड प्रतिबंधात्मक उपाय सुरूच ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

भारतात तीन लसी विकासाच्या प्रगत टप्प्यात आहेत, त्यापैकी 2 दुसऱ्या टप्प्यात आणि एक तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन पथके अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारील देशांबरोबर सहकार्य करत असून संशोधन क्षमता मजबूत करत आहेत. बांगलादेश, म्यानमार, कतार आणि भूतानकडून त्यांच्या देशांमध्ये क्लिनिकल चाचण्यांसाठी विनंती केली जात आहे. जागतिक समुदायाला मदत करण्याच्या प्रयत्नासाठी पंतप्रधानांनी सूचना केली की आपण लस वितरण प्रणालीसाठी लसी, औषधे आणि आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न शेजारी देशांपुरते मर्यादित ठेवू नये तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत.

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget