एक्स्प्लोर
स्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली, उपमुख्यमंत्री अडकले
'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे लोकार्पण होऊन अद्याप 15 दिवस झाले नाहीत, त्याअगोदरच या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडली.

अहमदाबाद : जगातला सर्वात उच पुतळा अशी ओळख असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण होऊन अद्याप 15 दिवस झाले नाहीत, त्याअगोदरच या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडली. लिफ्ट बंद पडल्यानंतर लिफ्टमधले लोक आतमध्ये अडकले. या अडकलेल्या लोकांमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचादेखील समावेश होता.
31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हा पुतळा पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. हा पुतळा पाहण्यासाठी केवळ गुजरातमधूनच नव्हे तर इतर राज्यातूनही लोक येत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी नुकतीच या स्मारकाला भेट दिली. सुशील मोदी पुतळ्यामध्ये असलेल्या लिफ्टने व्ह्यूईंग गॅलरीत जात होते. त्याचवेळी लिफ्ट बंद पडली, त्यामुळे ते काही वेळ लिफ्टमध्ये अडकले होते. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल आणि काही अधिकारीदेखील उपस्थित होते.
लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्यामुळे लिफ्ट अडकली होती. लिफ्टमधील काही लोक बाहेर पडल्यानंतर लिफ्ट पुन्हा सुरु झाली. केवळ एक मिनिट ही अडचण निर्माण झाली होती, अशी माहिती 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी संबधित अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















