एक्स्प्लोर

बेहिशेबी पैसा जाहीर केला तर 50%, पकडला तर 85% टॅक्स!, विधेयक संसदेत

नवी दिल्ली: काळा आणि बेहिशेबी पैसा दाबून ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आज संसदेत आयकर सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हे विधेयक सादर केलं. या दुरूस्ती विधेयकानुसार, 8 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर, बँकांमध्ये जमा होत असलेली बेहिशेबी रक्कम नियमित करून घेण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील गरीब श्रीमंत बँकांसमोर रांगा लावून आपल्या खात्यात पैसे जमा करत आहेत. यामध्ये अर्थातच बंद झालेल्या हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटांचा भरणा सर्वाधिक आहे. या भरणा होत असलेल्या रूपयांमध्ये बेहिशेबी आणि हिशेबी पैसा किती याचा नेमका अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळेच सरकारने आज संसदेत आयकर सुधारणा विधेयक संसदेत सादर केलं आहे. 8 नोव्हेंबर नंतर बँकेत जमा होत असलेल्या कोट्यवधीच्या रकमेत जर काही बेहिशेबी पैसे असतील तर त्यावर 30 टक्के आयकर आणि 10 टक्के दंड तसंच आयकरावर 33 टक्के अधिभार लावला जाणार आहे. एवढंच नाही तर, बेहिशेबी संपत्ती किंवा रक्कम जाहीर करणाऱ्या व्यक्तीने जमा केलेल्या रकमेवर सरकारने प्रस्तावित केलेला टॅक्स भरण्याशिवाय एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत समाविष्ट करावी लागणार आहे. कराची ही तरतूद जे बेहिशेबी संपत्तीधारक आपल्या बेहिशेबी संपत्तीचा स्वतःहून तपशील देतील, त्यांच्यासाठीच आहे. मात्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून किंवा छानणीत शोधून काढलेल्या बेहिशेबी संपत्तीधारकांना त्यांच्या एकूण बेहिशेबी संपत्तीपैकी तब्बल 75 टक्के रक्कम आणि त्यावर 10 टक्के कर असा जबर फटका बसणार आहे. आयकर सुधारणा दुरूस्ती विधेयक संसदेत सादर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या आयकर कायद्याच्या दुरूस्तीतच या तरतुदी असल्याने हा कायदा संमत झाला तर त्याला कायदेशीर दर्जाही प्राप्त होईल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जमा होणाऱ्या रकमेतून जलसिंचन, गृहनिर्माण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य सुविधा यावर खर्च केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget